महाराष्ट्राचा महासंग्राम : बडनेरामध्ये रवी राणांच्या साम्राज्याला खिंडार पडणार का?

बडनेरा मतदारसंघ अर्धा शहरी भागात मोडतो तर अर्धा ग्रामीण भागात येतो. ग्रामीण भाग आणि झोपडपट्टी परिसरात रवी राणा यांचं वर्चस्व असून बडनेरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असणारा सिंधी समाज, हिंदी भाषक आणि दलित हे राणा यांची ताकद आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 05:03 PM IST

महाराष्ट्राचा महासंग्राम : बडनेरामध्ये रवी राणांच्या साम्राज्याला खिंडार पडणार का?

अमरावती, 9 सप्टेंबर : 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे रवी राणा यांची एन्ट्री झाली आणि बडनेरा मतदारसंघातल्या मतदारांनी रवी राणा यांना आमदारकीची संधी दिली. 2014 मध्येही पुन्हा रवी राणाच निवडून आले. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यामुळे या निवडणुकीचा कल त्यांच्या बाजूने गेला. त्यांचा अवघ्या 6 हजार मतांनी इथे विजय झाला.

आता 2019 ची परिस्थिती वेगळी आहे. आता भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड या युतीच्या उमेदवार झाल्या तर मग रवी राणांसमोर आव्हान असणार आहे. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा अमरावतीच्या खासदार असल्यामुळे त्यांचं वजन वाढलं आहे. पण एकाच घरात आमदार आणि खासदार असण्याला अनेकांचा आक्षेप आहे.

युती अडचणीची ?

भाजप-शिवसेनेची युती राणांसाठी अडचणीची ठरू शकते. बडनेरा मतदारसंघ अर्धा शहरी भागात मोडतो तर अर्धा ग्रामीण भागात येतो. ग्रामीण भाग आणि झोपडपट्टी परिसरात रवी राणा यांचं वर्चस्व असून बडनेरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असणारा सिंधी समाज, हिंदी भाषक आणि दलित हे राणा यांची ताकद आहेत.

गणेश विसर्जनापूर्वी ठरणार 'युती'चा अंतिम फॉर्म्युला!

Loading...

बडनेरामध्ये यावेळी बसपाकडून चेतन पवार हे निवडणुकीच्या तयारीत आहेत तर काँग्रेसचे विलास इंगोले काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवू शकतात. पण रवी राणा आणि प्रीती बंड यांच्यामध्येच सामना होईल असं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांसाठी आमदारकीची निवडणूकही कठीण झाली आहे. एकेकाळी शिवसेनेचा गड असणारा हा मतदारसंघ आता सेनेपासून दूर गेला आहे.बडनेऱ्यामध्ये रवी राणा यांचा प्रभाव इथे कायम राहणार की भाजप-सेना युती त्यांचा पराभव करणार हा खरा प्रश्न आहे.

बडनेरा विधानसभा निवडणूक 2014 निकाल

रवी राणा, अपक्ष - 46 हजार 827

संजय बंड, शिवसेना- 39 हजार 408

============================================================================================

वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...