Maharashtra Election Result 2019 : महाराष्ट्रात वंचित उघडणार खातं, हा आहे मतदारसंघ

Maharashtra Election Result 2019 : महाराष्ट्रात वंचित उघडणार खातं, हा आहे मतदारसंघ

विदर्भात अकोला जिल्हा हा प्रकाश आंबेडकरांचा गड मानला जातो. त्याच जिल्ह्यातून वंचितची ओपनिंग होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

अकोला 24 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाची सर्वाधिक चर्चा झाली तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. वंचितकडे जिंकण्याची ताकद नाही मात्र तो पक्ष आघाडीचे उमेदवार पाडू शकतो असं बोललं जातं होतं. मात्र राज्यात पहिल्यांदाच वंचित आपलं खातं उघडण्याची शक्यता असून विदर्भातून वंचितच्या उमेदवार आघाडीवर आहेत. लोकसभेत वंचितची प्रचंड चर्चा झाली होती. आणि त्यामुळे आघाडीच्या 10 ते 15 उमेदवारांचा पराभव झाला असं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे विधानसभेत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विदर्भात अकोला जिल्हा हा प्रकाश आंबेडकरांचा गड मानला जातो. त्याच जिल्ह्यातल्या मूर्तीजापूर इथून वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार या आघाडीवर असून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत त्यांना 4 हजारांची आघाडी मिळाली होती.

Live Result Vidarbha :विदर्भातून भाजपच्या 'या' दिग्गज मंत्र्यांना धक्का बसणार?

भाजपचे विद्यमान आमदार हरिश पिंपळे यांना त्यांनी कडवी झुंझ दिली. भाजपमध्ये असलेली पिंपळे यांच्याविरुद्धची नाराजी, बंडखोरी याचा फटका आमदार पिंपळे यांना बसला असून वंचितच्या उमेदवार अवचार यांना फायदा झाला आहे.

भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या विदर्भावर पक्षाची मोठी भिस्त होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 2014ची स्थिती गाठण्यासाठीही दमछाक करावी लागण्याची शक्यता आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसू शकतो. भाजपचे मंत्री आणि यवतमाळचे उमेदवार मदन येरावार हे सहाव्या फेरीअखेर 2 हजार 473 मतांनी पिछाडीवर होते तर काँग्रेसचे बाळासाहेब मंगुळकर हे आघाडीवर आहेत. पक्षात असेली नाराजी, बंडखोरी याचा फटका मदन येरावार यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दुपारी 12 वाजेपर्यंत विदर्भातल्या 62 जागांपैकी भाजप 26, शिवसेना 07, काँग्रेस 16 तर राष्ट्रवादी 04 जागांवर आघाडीवर आहे.

राष्ट्रवादीने कशी फिरवली बाजी? 'त्या' पावसातल्या सभेचं होतं निमित्त

विदर्भात कोण किती जागांवर पुढे?

भाजप : २६

शिवसेना : ०७

काँग्रेस : १६

राष्ट्रवादी : ०४

अपक्ष : ०७

वंचित : ०१

स्वतंत्र भारत पक्ष :०१

एकूण जागा : ६२

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

विदर्भ भाजपला तारणार की फटका बसणार?

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या