'या' तीन नेत्यांचा आशीर्वाद असेपर्यंत ठाकरे सरकारला धक्का नाही - अजित पवार
'या' तीन नेत्यांचा आशीर्वाद असेपर्यंत ठाकरे सरकारला धक्का नाही - अजित पवार
'एखाद्या गोष्टीचा 'म' चा 'ध' काढल्या जाते. त्यामुळे बोलतांना खूप तोलून मापून बोलावं लागते, लवकर जाऊ द्या नाहीतर माझ्या तोंडातून एखादा शब्द बाहेर जाईल.'
अमरावती 28 जानेवारी : महाविकास आघाडीत सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर सावध उत्तर दिलंय. ते म्हणाले, सरकारमधल्या सगळ्या तिन्ही पक्षाच्या विचारधारा या वेगवेगळ्या आहेत. हे सरकारवर उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत काहीही होणार नाही. अजून माझं अशोक चव्हाणशी बोलणं झालं नाही. त्यामुळे ते नेमके काय बोलले ते मला समजू द्या. कारण एखाद्या गोष्टीचा 'म' चा 'ध' काढल्या जाते. त्यामुळे बोलतांना खूप तोलून मापून बोलावं लागते, त्यामुळे लवकर जाऊ द्या नाहीतर माझ्या तोंडातून एखादा शब्द बाहेर जाईल असं सांगत त्यांना या वादावर बोलण्याचं टाळलं.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या एका व्यक्तव्यामुळे महाआघाडीत ठिणगी पडलीय. सरकारमध्ये येताना शिवसेनेकडून घटनेप्रमाणे काम करणार असं लिहून घेतलं असं वक्तव्य चव्हाणांनी केलं होतं त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाराज असल्याची माहिती आहे.
चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे अकारण गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मत आहे. त्यामुळे अशी वक्तवे टाळावीत अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचं बोललं जातंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अशोक चव्हाणांनी असं वक्तव्य का केलं हे माहिती नाही अशी प्रतिक्रिया काल व्यक्त केली होती.
तीन वेगवेगळ्या देशाची तोंडे असणारी पक्ष राज्यात एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन झाली खरी पण शपथविधी होऊन पन्नास दिवस पूर्ण होत नाही तोच महाविकास आघाडीतील वेगवेगळ्या नेत्यांची विधान महाविकास आघाडीचं अंतर्गत कलह वाढवणारी ठरली आहे.
शिवसेनेच्या वतीने दररोज बोलणारे संजय राऊत भलेही महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेत सत्तेत महत्त्वाचा वाटा आणण्यासाठी रोल महत्वाचा केला असला तरी वेगवेगळ्या विधानावरून संजय राऊत वादग्रस्त ठरले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.