नागपूर, 23 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांत राज्यात गुन्ह्यांच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशात नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून पुतणीला विहरीत फेकल्याची घडना 18 ऑगस्टला घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी पुतणीला लोखंडी रॉडने वार घरत बेशुद्ध केलं आणि त्यानंतर विहिरत फेकलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीत फेकल्यानंतर पीडित तरुणाला वेळीच जाग आली आणि तिने आरडाओरड केली. यावेळी स्थानिकांनी धाव घेत तिला बाहेर काढलं आणि मोठा अनर्थ टळला. ही थरारक घटना मध्यरात्री भाग्यश्रीनगर इथे घडली आहे.
मुस्लीम मामा, हिंदू भाची! या फोटोनं जिंकलं महाराष्ट्राचं मन
भूमी भारती वय 15 असं जखमी पुतणीचं नाव आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी तिची काकू योगिता भारती आणि अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमी ही दहावीत शिक्षण घेत आहे.
भाजपच्या महिला आमदाराला कोरोनाची लागण, घरातील 5 जण निघाले पॉझिटिव्ह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमी रात्रीच्या सुमारास बाथरुमला जात असताना काकू योगिता आणि एका अनोळखी व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला आणि तिचे हात-पाय बांधून तिला विहिरीत फेकलं. पण भूमीच्या डोक्यावर कोणतीही इजा झाली नसून विहिरीतून बाहेर काढताना तिचे हात-पायही बांधले नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
भूमीची तक्रार आणि पोलीस तपास या फरक आल्यामुळे पोलिसांतही खळबळ आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस स्थानिकांची अधिक चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.