उद्धव ठाकरे भाजपला देणार 'चेकमेट', शनिवारी करणार मोठी घोषणा!

उद्धव ठाकरे भाजपला देणार 'चेकमेट', शनिवारी करणार मोठी घोषणा!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यासाठी आग्रही असून तो निर्णय केव्हा जाहीर करणार ते सांगा असा सवाल भाजपने पुन्हा एकदा केलाय.

  • Share this:

नागपूर 19 डिसेंबर : नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातले सर्व दिवस भाजपची भूमिका आक्रमक होती. हा आक्रमकपणा होता शेतकऱ्यांच्या भूमिकेवर होता. निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी घोषणा केली होती. त्याच प्रमाणं नुकसानग्रस्त शेतऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र सरकार येवून एक महिना झाल्यावरही त्याबाबात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मात्र कर्जमाफीसाठी काही हजार कोटी रुपये लागणार असल्याने त्याचं गणित कसं जुळवायचं याची तयारी सरकार करत असून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

ठाकरे VS फडणवीसः मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं क्लीन बोल्ड, पाहा UNCUT भाषण

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी मागणी गेली चार वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे करत आहेत. पण विरोधात असताना मागणी करणं वेगळं आणि सत्तेत आल्यावर त्याची अंमलबजावणी करणं वेगळं असतं अशी टीका केली जाते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली असून त्यांना कर्जमाफीसाठी योजना तयार करायला सांगितलं आहे.

या प्रश्नावर भाजपला चेकमेट देण्यासाठी लवकरच कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यासाठी सरकार तयारीत करत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यासाठी आग्रही असून तो निर्णय केव्हा जाहीर करणार ते सांगा असा सवाल भाजपने पुन्हा एकदा केलाय. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेतल्यावरही त्यावरून होणारं राजकारण थांबणार नाही अशी शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जातेय.

खडसेंचं ठरलं की काय, मुक्ताईनगर भाजप कार्यालयावरील मोदींसोबत असलेलं फलक गायब

काय म्हणाले फडणवीस?

उद्धव ठाकरेंच्या अभिभाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा एकही उल्लेख नसल्याने भाजपने सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला आहे. शेतकऱ्यांच्या 25 हजार कर्जमाफीवर काय आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी साधा हजार रुपयांचाही उल्लेख केला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सावरकरकांच्या मुद्दा, मराठा आरक्षण यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत देणार म्हणून एक दमडीही दिली नाही. त्यामुळे हे विश्वासघातकी सरकार असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

इतर बातम्या - मुंबईत उद्योगपतीने मित्रांसोबत केली पत्नीची देवाणघेवाण, 3 वेळा केला बलात्कार

शेकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर या सरकारने त्यांच्या तोंडाला पानं पुसली. आतापर्यंतच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचं असं पहिलं भाषण आहे ज्यामध्ये काहीही उत्तर मिळालं नाही. शेतकऱ्यांचा साधा उल्लेख नाही. त्यामुळे या शेतकऱी विऱोधी सभेचा आम्ही त्याग केला असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

खरंतर, हे सगळी खुर्ची वाचवण्याची कवायत आहे. शेजारी बसलेल्या दोघांना जपण्यासाठी आणि त्यांच्याविरोधात कोणतंही स्टेटमेंट न करण्याचा आणि त्यांना नाराज न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी हा काळा दिवस आहे त्यामुळे आम्ही सभेचा त्याग केला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 19, 2019, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading