उगाच इथं बोंबलू नका, केंद्राकडे पैसे मागा; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं

उगाच इथं बोंबलू नका, केंद्राकडे पैसे मागा; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं

'जामिया मीलीयात जे झालं ते जालीयनवाला बाग प्रकरणापेक्षा वेगळं नव्हतं. युवकांना बिथरवू नका. तरुणाई म्हणजे बॉम्ब आहे.'

  • Share this:

प्रफुल साळुंखे, नागपूर 17 डिसेंबर : नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना बघायला मिळाला. सावरकरानंतर आता भाजपने शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विधानसभा डोक्यावर घेतली. सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये भर सभागृहातच हाणामारी झाल्याने वातावरण आणखी चिघळलं. नंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या दालनात बैठक बोलावली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा शेतकऱ्यांचा कळवळा हा खोटा आहे. भाजपने उगाच इथे बोंबलू नये केंद्राकडे जाऊन पैसै मागावे असं त्यांनी भाजपला सुनावलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, हे या सरकारचं पाहिलं अधिवेशन आहे. सभागृहचं कामकाज जग बघतं. माझी दोन्ही पक्षांना विनंती सभागृहाच्या इतिहासाला काळिमा फसू नका.

भाजप आमदारासोबत धक्काबुक्की करणाऱ्या शिवसेना आमदाराची पहिली प्रतिक्रिया

फक्त विरोधी पक्ष आहे सत्तारूढ पक्षला काही देणं घेणं नाही हे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होतोय. शेतकऱ्यांना वचन दिलंय ते आम्ही पाळणार. फक्त बोंबल्ल्याने प्रश्न मार्गी लागत नाहीत असंही त्यांनी सुनावलं. आम्ही सामना वाचत नाही म्हणाऱ्यांना सामना हातात घेण्याची वेळ आलीय. आधी सामना वाचला असता तर विरोधात बसले नसते. चोरून सामना वाचण्यापेक्षा उघडपणे सामना वाचला असता तर आज सामना करायची गरज नसती. पूरग्रस्तांसाठी 7 हजार आणि अवकाळी पावसासाठी 7 हजार कोटी केंद्राकडे मागितले आहेत.

विरोधकांनी इथे गळा मोकळा करण्यापेक्षा केंद्राकडे करा, हवं असल्यास घसा मोकळ्या करण्याच्या गोळ्या मी देतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

ते पुढे म्हणाले, जामिया मीलीयात जे झालं ते जालीयनवाला बाग प्रकरणापेक्षा वेगळं नव्हतं. युवकांना बिथरवू नका , घात होईल युवक तरुणाई म्हणजे बॉम्ब आहे असा इशाराही त्यांनी दिला.

BREAKING शिवसेना आणि भाजपच्या दोन आमदारांमध्ये हाणामारी, अधिवेशनाला वादळी वळण

विधानसभेत काय झालं?

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना सभागृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये थेट हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं.

सभागृहात दोन आमदारांमध्ये थेट हाणामारी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर सत्तारूढ पक्षाकडून जयंत पाटील आणि भास्कर जाधव आमदारांना समजावत आहेत. तर भाजपकडून आशिष शेलार आणि गिरीश महाजन हे भाजप आमदारांना आवरण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2019 02:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading