निवडणूक आयोगाच्या आधीच अर्थमंत्र्यांनी सांगितली विधानसभेच्या निवडणुकीची तारीख

निवडणूक आयोगाच्या आधीच अर्थमंत्र्यांनी सांगितली विधानसभेच्या निवडणुकीची तारीख

काही आठवड्यात निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. पण ही घोषणा होण्याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुका केव्हा होतील याबाबत माहिती दिलीय.

  • Share this:

नागपूर 30 ऑगस्ट : महाराष्ट्रात आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. काही आठवड्यात निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. पण ही घोषणा होण्याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुका केव्हा होतील याबाबत माहिती दिलीय. मुनगंटीवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता 12 सप्टेंबरच्या दरम्यान लागणार असून, 15 ऑक्टोबर दरम्यान निवडणूक होईल. 2014मध्येही  याच काळात निवडणूक झाली होती अशी  माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. 288 जागांवर  तयारी सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळच्या सरकारने तब्बल 25 महत्त्वाचे निर्णय घेतले. आचारसंहिता लागण्याआधी लोकप्रिय निर्णय घेण्यावर सरकारचा भर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवानंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जंबो निर्णय घेण्यात आले. सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या किमान 3 बैठका होणार आहेत.

भास्कर जाधवांचं भाजपबाबत ठरलं! कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला हा निर्णय

बैठकीत राज्य सरकारने मिशन मंगल चित्रपटाला करमाफी करण्याचा निर्णय देखील घेतला. यापूर्वी सरकारने 'सुपर 30' या चित्रपटाला देखील करमाफी दिली होती. याशिवाय राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ करण्याचा देखील घेण्यात आला.

...आणि शरद पवार पत्रकार परिषदेत भडकले

श्रीरामपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सार्वजनीक कार्यक्रमात फारसे कधी चिडत नाही की रागावत नाहीत. ते कायम आपल्या संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. कुठल्याही कठीण प्रश्नावर ते अगदी संयमाने कायम उत्तरं देतात. आणि टीका करतानाही त्यांचा तोल कधी जात नाही. मात्र आज श्रीरामपूर इथं एका कार्यक्रमासाठी आलेले पवार पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर चांगलेच भडकले आणि त्यांनी त्या पत्रकाराला त्या प्रश्नाबद्दल माफीचीही मागणी केली. ज्या प्रमाणावर नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाताहेत त्याच संदर्भातला एक प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता.

पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130

राष्ट्रवादीमधून सध्या अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. राष्ट्रवादीला लागलेली ही गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. सध्या अनेक दिग्गजांची नावंही चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे बडे नेते जिथे जातील तिथे त्यांना त्याबाबतचा प्रश्न हमखास विचारण्यात येतोच. श्रीरामपूरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषेद एका पत्रकाराने पवारांना तुमच्या जवळचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत, तुमचे अनेक नातेवाईक असेलेल नेतेही पक्ष सोडत आहेत असा प्रश्न विचारला.

VIDEO : बीडमध्ये राजकारण तापलं, पंकजा मुंडेंची अजित पवारांवर जहरी टीका

नातेवाईकांच्या प्रश्न शरद पवारांना आवडला नाही. त्या प्रश्नावर त्यांचा पारा चढला. इथे नात्याचा तुम्हा प्रश्न का विचारला असा प्रश्न त्यांनी केला. इथं नात्याचा प्रश्नच येत नाही. हा तुमचा प्रश्न हा औचित्याचा भंग करणारा आहे. याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे असं त्यांनी सुनावले आणि मी पत्रकार परिषद सोडून जातो असं ते म्हणाले. जेव्हा सगळ्यांनी त्यांना बसण्याची विनंती केली तेव्हा ते शांत झाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 30, 2019, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading