'आघाडी'च्या उमेदवारावर चाकू हल्ला, 'कार'वर हल्ला करून गाडी जाळली!

उमेदवारावर चाकू हल्ला करत त्यांची कारही हल्लेखोरांनी जाळून टाकली. उमेदवाराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 12:25 PM IST

'आघाडी'च्या उमेदवारावर चाकू हल्ला, 'कार'वर हल्ला करून गाडी जाळली!

संजय शेंडे, अमरावती 21 ऑक्टोंबर : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघात कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी धनोडी वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला चढवला. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची कार मात्र पूर्णतः जळून राख झाली आहे. या घटनेनंतर भुयार यांच्या कार्यकाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. रक्तदाब कमी झाल्याने भुयार यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन देवेंद्र भुयार यांची भेट घेऊन चौकशी केली,  वाहनावर हल्ला करून कार जाळण्यात आल्याची कबुली खुद्द पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. देवेंद्र भुयार यांचा वाहन चालक व एका साथीदाराला वरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोर्शी मतदार संघात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केलंय.

शिवसेनेच्या बंडखोर कार्यकर्त्यांना मारहाण, एक जण गंभीर

करमाळ्यातही हाणामारी

करमाळ्यात मतदानला गालबोट लागलंय. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी असा आरोप केलाय.या मारहाणीत नारायण पाटलांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. कार्यकर्त्यांच्या डोक्यात मारहाण झाल्याने कार्यकर्ता जखमी झाला.

वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं, पंकजा मुंडे व्यक्त केल्या भावना

Loading...

बाळु जगताप, बापुराव जगताप, संतोष देवकर, पिंटु जगताप, औंदुबर खोचरे, गणेश जगताप,अनिल जगताप, सुभाष जगताप या कार्यकर्त्यांना जबर मारहाण व चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. जखमी वर टेंभुर्णी येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...