काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह... यामुळे रद्द झाली 'महापर्दाफाश' सभा

काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह... यामुळे रद्द झाली 'महापर्दाफाश' सभा

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील संघर्ष उफाळून आल्याने ब्रम्हपुरी येथे बुधवारी होणारी 'महापर्दाफाश' सभा अखेर रद्द करण्यात आली आहे.

  • Share this:

हैदर शेख, (प्रतिनिधी)

चंद्रपूर, 28 ऑगस्ट- काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील संघर्ष उफाळून आल्याने ब्रम्हपुरी येथे बुधवारी होणारी 'महापर्दाफाश' सभा अखेर रद्द करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसच्या नेतृत्त्वाच्या संघर्षात विजय वडेट्टीवार यांचा विजय झाल्याचे बोलले जात आहे.

विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहेत. 'महापर्दाफाश' सभा रद्द होण्यामागे विजय वडेट्टीवार यांची खेळी असल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय उमेदवार छाननी समितीची बैठक असल्याचे कारण विजय वडेट्टीवार यांनी पुढे केले आहे.

काँग्रेसच्या अडचणी वाढणार, विजय वडेट्टीवार नाराज!

दरम्यान, विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. असे असताना काँग्रेस पक्षातला गोंधळ संपण्याची काही चिन्हे नाही. राज्यातले विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हेच पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत. महत्त्वाच्या समितीतच डावलण्याने ते नाराज आहेत. हे पक्षातले राजकारण असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. त्यामुळे आधीच विस्कळीत झालेल्या काँग्रेसमध्ये अजुनही काहीही सुधारणा झालेली नाही, असेच म्हटले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच आपली निवड समिती जाहीर केली आहे. पण या समितीत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना स्थान नाही. निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या समितीतच आपले नाव नसल्याने वड्डेटीवार नाराज आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निवड समिती माझे नाव नसल्याने आश्चर्य वाटले, यापूर्वी निवड समिती विरोधीपक्ष नेत्याचे नाव असायचे, पण यावेळी नाही. या समितीत माझे नाव नाही, हे राजकारण आहे. मला महाराष्ट्रातील मतदारसंघांची माहिती आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मनातली खदखद काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा निवड समितीत समावेश करण्यात आला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड करण्यासाठी सोनिया गांधी यांनी एका समितीची नियुक्ती जाहीर केली होती. काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे हे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. या समितीत हरिश चौधरी, मनिकम टागोर हे सदस्य तर ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नेते के. सी. पडवी यांचा समावेश करण्यात आला आहे.

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

First Published: Aug 28, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading