रवी राणा-नवनीतकौर राणांना 'युती'चा बसला मोठा फटका, राष्ट्रवादीच्या वाटेवर?

रवी राणा-नवनीतकौर राणांना 'युती'चा बसला मोठा फटका, राष्ट्रवादीच्या वाटेवर?

बडनेरा मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही

  • Share this:

अमरावती,30 सप्टेंबर: बडनेरा मतदार संघातून विद्यमान आमदार रवी राणा पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. परंतु ही जागा शिवसेनेकडे गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या जवळ गेलेले रवी राणा आणि खासदार नवनीतकौर राणांची चांगलीच कोंडी झाली आहे. बडनेरा मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केला, पण यश आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदार रवी राणा पुन्हा राष्ट्रवादीकडे तिकिटासाठी फेऱ्या मारत असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीतकौर राणा यांनी अजित पवार यांची घेतली भेट घेतली. अजित पवार आणि इतर नेत्यांना भेटून तिकीट मिळवण्यासाठी रवी राणा यांचे प्रयत्न सुरू आहे. भाजप-शिवसेनेची युती होत असल्याने अनेक इच्छुकांची मात्र गोची झाली आहे.

दरम्यान, एकेकाळी शिवसेनेचा गड असणारा बडनेरा मतदार संघ मागील 15 वर्षांपासून शिवसेनेपासून दूर गेला होता. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार ज्ञानेश्वर धाने यांचा पराभव करुन राष्ट्रवादी-काँग्रेसच्या सुलभा खोडके विजयी झाल्या होत्या. बडनेरा मतदार संघावर आता बराच काळ खोडके यांचे साम्राज्य राहील, अशी सर्व परिस्थिती असताना 2009 च्या निवडणुकीत कोणतही राजकीय पार्श्वभूमी नसणारे रवी राणा यांनी राजकारणात एन्ट्री झाली. एवढेच नाही तर ते बडनेरा मतदार संघातून आमदार झाले. रवी राणा यांच्या लोकप्रियतेची जादू 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली. भाजप आणि शिवसेनेची युती असती तर कदाचित राणा 2014 मध्ये निवडून आले नसते, असा अनेकांचा अंदाज होता.

रवी राणांसाठी 'युती' ठरली घातक..

भाजप- शिवसेनेची युती राणांसाठी अतिशय घातक ठरली आहे. बडनेरा मतदारसंघ अर्धा शहरी भागात मोडतो तर अर्धा ग्रामीण भागात येतो. ग्रामीण भाग आणि झोपडपट्टी परिसरात रवी राणा यांचे वर्चस्व असून बडनेरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणत असणारा सिंधी समाज, हिंदी भाषिक आणि दलित हे राणा यांची ताकद आहेत. त्यात हा मतदार संघ आता शिवसेनेच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे आता रवी राणा यांची चांगलीच गोची झाली आहे.

2014 च्या निवडणुकीत रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे दिवंगत संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय आणि राष्ट्रवादी सोडून गत निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरलेल्या सुलभा खोडके यांचे तगडे, आवाहन रवी राणा यांच्यासमोर होते. मतमोजणीच्या अखेरच्या क्षणापर्यंत संजय बंड आणि रवी राणा यांच्यात काट्याचा सामना असल्याचे पाहायला मिळाले. मात्र अखेरच्या क्षणाला रवी राणा यांचा विजय झाला.

2019 च्या निवडणुकीची परिस्थिती पूर्वीपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड या युतीच्या उमेदवार असल्या तर रवी राणा यांना येणारी निवडणूक अजिबात सोपी नसणार नाही. आता रवी राणा यांच्या पत्नी नवणीत राणा या अमरावतीच्या खासदार असल्याने त्यांचे वजन वाढले आहे. परंतु एकाच घरात खासदार आणि आमदार अनेकांना खटकटत आहे. आता रवी राणा आणि खासदार नवनीतकौर राणा काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

Published by: Sandip Parolekar
First published: September 30, 2019, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading