MIM सोबतची युती तुटली...प्रकाश आंबेडकरांनी केला हा गौप्यस्फोट

गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही. 'एमआयएम'सोबत (MIM)युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा गौप्यस्फोट करत एमआयएम सोबतची युती तुटल्याची कबुली 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 09:29 AM IST

MIM सोबतची युती तुटली...प्रकाश आंबेडकरांनी केला हा गौप्यस्फोट

संजय शेंडे, (प्रतिनिधी)

अमरावती, 12 सप्टेंबर: गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही. 'एमआयएम'सोबत (MIM)युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा गौप्यस्फोट करत एमआयएम सोबतची युती तुटल्याची कबुली 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमला सुद्धा आहे, अशा शब्दात एमआयएमला पुढील वाटचालीसाठी बाळासाहेबांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे विधानसभेच्या 25 जागा मुस्लिम समाजातील उमेदवारांना देणार अशी घोषणा बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने सत्तासंपादन व प्रबोधन मेळाव्यात आले असता बाळासाहेबांनी पत्रकारांशी संवाद साधला. वंचित आघाडी सत्तेवर येणार या भीतीने विरोधी पक्षातील नेते भाजपत प्रवेश करत असल्याचा टोलाही बाळासाहेबांनी यावेळी लगावला.

'युती'ची घोषणा लवकरच

दुसरीकडे, भाजप आणि शिवसेनेच जागावाटपावरून काही अडचणी असल्या तरी चर्चेच्या माध्यमातून त्या सोडवण्यात येतील. आठवडाभरात युतीची घोषणा होईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. जागावाटप ही जरा किचकट प्रक्रिया असते. दोनही पक्षांमध्ये अनेक नवे लोक येत आहेत. आमची ताकद वाढत आहे. त्यामुळे काही जागांबाबतही फेरविचार करावा लागतो. त्यामुळे थोडा वेळ लागत असल्याचेही ते म्हणाले. युती अभेद्य असून आम्ही ऐतिहासिक विजय मिळवू, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. मुनगंटीवार हे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला आले होते. त्यांनंतर त्यांनी 'न्यूज18 लोकमत'ला ही माहिती दिली. भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असून भाजपला थोड्या जास्त जागा पाहिजे आहेत. तर शिवसेना 50 टक्के फॉर्म्युल्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Loading...

SPECIAL REPORT:समस्या दूर करा नाहीतर मुख्यमंत्र्यांचं श्राद्ध घालू, विठुरायाच्या नगरीत विद्यार्थ्यांचा टाहो!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 09:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...