'वंचित'च्या यादीत नाव झळकल्याने राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याला फुटला घाम

'वंचित'च्या यादीत नाव झळकल्याने राष्ट्रवादीच्या या पदाधिकाऱ्याला फुटला घाम

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे नाव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत झळकल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे,(प्रतिनिधी)

यवतमाळ, 30 सप्टेंबर: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे नाव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत झळकल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीने सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सरचिटणीस म्हणून काम पाहाणारे डॉ.महेंद्र लोढा यांचे नाव आले आहे.

वणी विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार असलेले डॉ.महेंद्र लोढा हे विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे जवळचे मित्र आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हा मतदारसंघ मूळ कॉंग्रेसचा आहे. या ठिकाणी या आधी 15 वर्षे कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले. मागील काही निवडणुकीत हा मतदारसंघ एकवेळ शिवसेनेच्या ताब्यात गेला. तर मागील निवडणुकीत या ठिकाणी भाजपने बाजी मारली होती. आघाडीच्या इच्छुक उमेदवाराचे नाव आघाडीच्या यादीत न येता थेट वंचित बहुजन आघाडीच्या यादीत आल्याने डॉ.महेंद्र लोढा यांना सुद्धा घाम फुटला आहे.

'वंचित'ची दुसरी यादी जाहीर, गिरीश महाजन, अशोक चव्हाणा विरोधात दिले 'हे' उमेदवार

मुंबई, 30 सप्टेंबर: अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने सोमवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 122 जणांची नावे आहेत. याआधी वंचितने 22 जणांची पहिली यादी दिली होती. त्यामुळे वंचितने आतापर्यंत 142 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. लवकरच वंचितकडून उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

गिरीश महाजनांच्या विरोधात दिला हा उमेदवार...

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात वंचितने जामनेरमधून सुमीत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तसेस कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधातही वंचितने उमेदवार जाहीर केला आहे. भोकर मतदारसंघामधून वंचितने नामेदव आईलवार यांना रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यत लक्ष लागले आहे. बहुतांश पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी गेली लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र, जागावाटपाच्या मुद्द्यावरुन एमआयएम आणि वंचित आघाडीने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काडीमोड केली. यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. महत्त्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीने यादी जाहीर करताना उमेदवारांच्या जातीचाही उल्लेख केला आहे.

VIDEO:...म्हणून वंचित आघाडीतून पडलो बाहेर, पडळकरांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 08:31 PM IST

ताज्या बातम्या