...तर घरात घुसून मारेल, काँग्रेसच्या आमदाराने गावकऱ्यांना दिली धमकी

...तर घरात घुसून मारेल, काँग्रेसच्या आमदाराने गावकऱ्यांना दिली धमकी

सावनेर येथील काँग्रेस आमदार सुनील केदार यांचा गावकऱ्यांना धमकी दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर, 13 सप्टेंबर: सावनेर येथील काँग्रेस आमदार सुनील केदार यांचा गावकऱ्यांना धमकी दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आमदार सुनील केदार यांनी गावकऱ्यांना चक्क घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. भाजपचा झेंडा लावून जे जे लोक फिरतात, त्यांनी यापुढे मस्ती केली तर त्यांना घरात घुसून मारेल, अशा शब्दात आमदार यांनी धमकी दिली आहे.

सिल्लेवाडा गावातील एका सभेत बोलताना आमदार सुनील केदार यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. आता त्यांचा हा धमकीचा व्हिडिओ सोशल माध्यमांत व्हायरल झाला आहे. तत्पूर्वी, सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या उद्घाटन कार्यक्रम निमंत्रणावरून आमदार केदार आणि भाजप जिल्ह्याध्यक्ष राजीव पोतदार यांच्यात चांगलीच  जुंपली होती. दोघांमध्ये शाब्दीक चकमकही झाली होती. त्यानंतर सुनील केदार यांनी आपल्या भाषणात धमकी दिल्या नंतर सावनेरमध्ये तणाव पसरला आहे. सुनील केदार यांचा हा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर केदार यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

विनापरवानगी बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, भाजप आमदाराला अटक

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंबड येथील पाचोड चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. पाचोड चौकात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर भल्या पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास एका आयशर वाहनातून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून बसवण्यात आला. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही.

भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा विनापरवाना बसविण्यात आला. दरम्यान, रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर आमदार नारायण कुचे यांच्यासह 41 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांशी शाब्दिक चकमक..

यावेळी पोलीस आणि आमदार व समर्थकात शाब्दिक चकमक देखील झाली. अंबड शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, काही तरुणांनी अंबडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला असून लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथं गेलो होतो, त्यात गैर काय पोलिसांनी मला का अटक केली. हे मला माहित नसल्याचे आमदार नारायण कुचे यांनी सांगितले आहे.

SPECIAL REPORT: भाजपचा आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स तर ठरणार नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2019 12:19 PM IST

ताज्या बातम्या