खरा जाणता राजा 'नरेंद्र मोदी', पवारांनी कुटुंबाच्या पलीकडे काम केले नाही!

खरा जाणता राजा 'नरेंद्र मोदी', पवारांनी कुटुंबाच्या पलीकडे काम केले नाही!

शरद पवार हे महाराष्ट्राचा जानता राजा म्हणून अनेक वर्षे गाजले. त्यांनी काय केलं, हे जनतेला कळू लागले आहे. कुटुंबाच्या पलीकडे त्यांनी काम केली नाही.

  • Share this:

वर्धा,14 सप्टेंबर: शरद पवार हे महाराष्ट्राचा जानता राजा म्हणून अनेक वर्षे गाजले. त्यांनी काय केलं, हे जनतेला कळू लागले आहे. कुटुंबाच्या पलीकडे त्यांनी काम केली नाही. आम्ही देशाचा, राज्याचा विकास करीत आहोत. सोबतच देशाचा खरा जानता राजा कोणी असेल छत्रपती शिवरायांनंतर त्यांचं नाव आहे 'नरेंद्र मोदी' असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी वर्ध्यात केले. ते वर्ध्याच्या बॅचलर रोडवर स्थापित होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या भूमीपूजनाप्रसंगी पत्रकारांसोबत बोलत होते.

'जानता राजा' हा शब्द सर्वांना लागू होत नाही, खरे जाणते राजे आमचे नेते मंडळी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या देशाची गरज काय ओळखून त्यांनी देशाच्या विकासाची काम हाती घेतली. देशाच्या सीमा रक्षणापासून सुरक्षेपर्यंत. कृषीप्रधान देश आणि लोकसंख्या पाहून जी काम हाती घेतली म्हणून देशाचा खरा जानता राजा कोणी असेल छत्रपती शिवरायांनंतर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. त्यांनी या देशाच भवितव्य, वैभव जगाला दाखवून दिलं, म्हणून लोकांचं आकर्षन भाजपकडे आहे. येणारी काँग्रेस, राष्ट्रवादीतील मंडळी मोदी, फडणवीस यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत आहे. कोण कोणाला सोडत आहे, याला महत्त्व नाही, पंतप्रधान मोदी यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये येत असल्याचे मत हंसराज अहिर यांनी व्यक्त केले आहे.

सावरकर भक्तांचं सरकार देशामध्ये स्थापन आहे..

सध्या देशात सावरकर भक्तांचं सरकार स्थापन आहे. आणि ही मंडळी अखंड भारताचा स्वप्न उराशी बाळगून आहे, असे प्रतिपादन हंसराज अहिर यांनी केले. देशातलं सरकार जे आहे, त्यामध्ये पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी या सगळ्यांना मी निस्सीम भक्त म्हणून ओळखतो. हे सावरकरांचे फार जवळचे निस्सीम भक्त आहेत. मी अमित शहांच्या बंगल्यामध्ये पाहिलं त्यांच्या बंगल्यात आणि ऑफिसमध्ये सावरकरांची प्रतिमा आहे, लहान पुतळा आहे. लाखेजीच्या समितीनेसुद्धा नितीन गडकरींना सावरकरांच्या नावानं पुरस्कार दिला आहे. म्हणून या सावरकर भक्तांच सरकार देशामध्ये स्थापन आहे. या देशभक्त सावरकर भक्तांच्या सरकारमध्ये 370, 35 a एवढे मर्यादित सरकारचं काम राहणार नाही आहे. अखंड भारताचं स्वप्न पाहणारी मंडळी सत्तेमध्ये आहे. देशाच्या रक्षणासाठी आम्ही सत्तेमध्ये आलों आहो. पंतप्रधान पहिल्या दिवशी म्हणाले होते, देश की रक्षा करणी है, सीमा की सुरक्षा करणी है, हा देश आता सुरक्षित, संपन्न, सामर्थ्यवान बनत आहे. त्यामध्ये प्रेरणा सावरकरांची आणि सावरकरांसारख्या देशभक्तांचीच आहे.

SPECIAL REPORT: माजी पोलीस अधिकारी प्रदीश शर्मांच्या हाती बंदुकीऐवजी आता धनुष्यबाण

Published by: Sandip Parolekar
First published: September 14, 2019, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading