'या' केंद्रांवर असं स्वागत झालं की मतदारही झाले खूष!

'या' केंद्रांवर असं स्वागत झालं की मतदारही झाले खूष!

महिला मतदारासाठी सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यांना सजवण्यात आलंय. त्यामुळे ही मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं आहे.

  • Share this:

भास्कर मेहेरे, यवतमाळ /मुंबई 21 ऑक्टोंबर : जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आयोगाने अनेक उपक्रम राबवले आहेत. मुंबईतल्या भायखळा इथलं मतदान केंद्र रांगोळ्या आणि फुग्यांनी सजविण्यात आलंय. मतदान केंद्रबाहेर अतीशय सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. तर मतदान केंद्राच्या प्रवेश व्दारावर फुग्यांची सजावट करण्यात आलीय. तर विदर्भातल्या यवतमाळमध्ये मतदारांचं औक्षण करण्यात आलंय. महिला मतदारासाठी  सखी मतदान केंद्र आहे त्याला ही  सजवण्यात आल आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं आहे. राज्यातल्या अनेक शहरांमध्येही अशाच प्रकारे मतदानकेंद्र सजविण्यात आले आहेत.

मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स - उदयनराजे भोसले

यवतमाळ शहरातील नगर परिषदच्या संजय गांधी शाळेच्या मतदान केंद्रावर प्रशासनाच्यवतीने तहसीलदार रुपाली बेहरे यांनी मतदारांचे जोरदार स्वागत केलं. एवढच नव्हे तर त्यांचं औक्षण करून आणि गुलाब पुष्प  देऊन त्यांचं स्वागत केलं तसच त्यांना कापडी पिशवी ही देण्यात आली.  या ठिकाणी  एक सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे त्याला पंख आहे आणि या माध्यमातून मतदार येऊन त्यांचा मतदानाची टक्केवारी वाढावी असा त्यामागचा दुहेरी उद्देश आहे. महिला मतदारासाठी  सखी मतदान केंद्र आहे त्याला ही  सजवण्यात आल आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं आहे.

सरसंघचालक मोहन भागवत आणि अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

कुठे मिसळ तर कुठे कटिंग दाढी मोफत

मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडावं यासाठी सरकार आणि निवडणूक आयोग कायम प्रयत्न करत असतात. तरीही मतदानाचं प्रमाण हे फार जास्त होत नाही. सरकारच्या जनजागृती मोहिमेत आता जनताही सहभागी होतेय. व्यावसायिकांनी या अनोखी शक्कल शोधून काढलीय. कुणी कडक मिसळ मोफत देतोय, कुणी एकावर एक फ्री तर कुणी दाढी- कटिंगही मोफत करून देतोय. मतदान केल्याचं दाखवा आणि कडक मिसळीवर मनसोक्त ताव मारा असं आव्हान या मंडळींनी मतदारांना केलंय. यात सर्वात आघाडीवर आहे ते पुणे. पुण्यातल्या जशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत तशीच प्रसिद्ध आहे ती मिसळ. मिसळीचे अनेक प्रकार पुण्यात बघायला मिळतात.

मतदानासाठी जाताना या 7 गोष्टी लक्षात असू द्या

त्यामुळे अनेक मिसळवाल्यांनी मतदान केल्याचं दाखवा आणि मिसळ खा असं सांगितलंय. तर अनेकांनी एकावर एक फ्री मिसळ देण्याचं आश्वासन दिलंय. पुण्याबरोबरच मुंबई, नाशिक आणि कोल्हापुरातल्याही काही मिसळवाल्यांनी मिसळीवर ताव मारण्यासाठी मतदारांना बोलावलंय. तर नाशिकमध्ये काही सलूनवाल्यांनी मतदान करून या आणि दाढी कटींग मोफत करा असं मतदारांना सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2019 09:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading