मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, निवडणूक आयोगाने दिला हा निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, निवडणूक आयोगाने दिला हा निर्णय

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा आक्षेप फेटाळत मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ठरवला. नोटरीचा कालावधी वाढवल्याचा प्रशासनाने निर्वाळा दिला आहे.

  • Share this:

नागपूर,5 ऑक्टोबर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी काल, शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यावर काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा आक्षेप फेटाळत मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ठरवला. नोटरीचा कालावधी वाढवल्याचा प्रशासनाने निर्वाळा दिला आहे.

जुनाच स्टॅम्प वापरल्याचा आरोप..

मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करताना जुनाच स्टॅम्प वापरल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. 28/12/2018 मध्ये नोटरीची मुदत संपली आहे. मुख्यमंत्र्यांची उमेदनारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी केली होती.

मुख्यमंत्री निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार शक्तीप्रदर्शन करत देवेंद्र फडणवीस यांनी आपला अर्ज दाखल केला होता. यावेळी त्यांच्यासोबत नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटलांचा अर्ज वैध...

दुसरीकडे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. या

हरकतीवर झालेल्या सुनावणीत विखेंचा अर्ज वैध ठरवल्याचा निर्णय शिर्डी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी आक्षेप घेतला होता. विखेंनी ज्याच्याकडे प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या वकीलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकार नसल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी तक्रारीवर शनिवारी तीन वाजता सुनावणी झाली. त्यानंतर विखेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी स्वतः आणि आपल्या प्रतिनिधी करवे तीन असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, हे अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावर कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी हरकत घेतली आहे. ज्या वकिलाकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आले त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 साली संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. याबाबत लेखी तक्रार शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती.

VIDEO:कमळ चिन्हावर लढण्याबाबत रामदास आठवले म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 07:35 PM IST

ताज्या बातम्या