काँग्रेस कार्यकर्त्यानं पुकारला आपल्या नेत्याच्याच विरोधात बंड, केलं असं...

काँग्रेस कार्यकर्त्यानं पुकारला आपल्या नेत्याच्याच विरोधात बंड, केलं असं...

धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव व वरुड बगाजी येथील प्रसूती रुग्णास अश्लील शिवीगाळ करणाऱ्या मंगरुळ दस्तगिर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर चौकशी अहवालानुसार दोषी आढळून सुद्धा कारवाई नाही...

  • Share this:

अमरावती, 18 सप्टेंबर:धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव व वरुड बगाजी येथील प्रसूती रुग्णास अश्लील शिवीगाळ करणाऱ्या मंगरुळ दस्तगिर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर चौकशी अहवालानुसार दोषी आढळून सुद्धा कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते तथा धामणगाव रेल्वे पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील सिसोदे यांनी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या विरोधातच बंड पुकारला आहे. चांदूर रेल्वे येथील आमदारांच्या घरासमोर त्यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव येथील एक आदिवासी महिला 28 सप्टेंबर 2017 ला रात्री 12.30 वाजता प्रसूती करता मंगरूळ दस्तगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेले होती. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे यांनी सदर आदिवासी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर 8 ऑक्टोंबर 2017 रोजी डॉ.संतोष माने यांना समितीप्रमुख नेमून 7 लोकांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्या चौकशी समितीमध्ये डॉ. डोंगरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे व इतर अनेक गंभीर आरोप सिद्ध झाले. सर्व आरोप चौकशी समितीच्या अहवालामध्ये नमूद असल्याचे उपोषणकर्ते सुनील सिसोदे यांनी सांगितले. या सर्व बाबींच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या असता चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाई न करता थातूरमातूर कारवाई करून पदाधिकारी व अधिकारी यांनी दोषींना सहकार्य केल्याचा आरोप सुनील सिसोदे यांनी केला. सदर वैद्यकीय अधिकाऱ्यावर दोन वर्षांपासून कोणतीही कारवाई न झाल्यानंतरही आमदार वीरेंद्र जगताप यांनी आरोग्य मंत्री यांच्याकडे तक्रार केली नाही किंवा विधानसभेत सुद्धा प्रश्न उचलला नसल्यामुळे मी आमरण उपोषणाला बसलो आहे, असे सुनील सिसोदे यांनी सांगितले. आपल्याच नेत्याविरोधात कार्यकर्ता उपोषणाला बसल्यामुळे अनेकांनी उपोषणस्थळी गर्दी केली होती.

SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 02:35 PM IST

ताज्या बातम्या