बंजारा समाजाची 'काशी' पोहरादेवीत मुख्यमंत्र्यांनी घेतला या महाराजांचा आशीर्वाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील मुरब्बी राजकारणी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिला

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2019 07:51 PM IST

बंजारा समाजाची 'काशी' पोहरादेवीत मुख्यमंत्र्यांनी घेतला या महाराजांचा आशीर्वाद

किशोर गोमाशे,(प्रतिनिधी)

वाशिम,15 ऑक्टोबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील मुरब्बी राजकारणी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बंजारा समाजाची 'काशी' असलेल्या पोहरादेवीला भेट देऊन रामराव महाराजांचे आशीर्वाद घेतला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कारंजा विधानसभेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांच्या प्रचारासाठी कारंजाला आले होते. त्यांनी कारंजा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या व राज्यभरातील समस्त बंजारा मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी बंजारा समाजाची 'काशी' म्हणून प्रख्यात असलेल्या पोहरादेवी येथे भेट दिली. मात्र, समस्त बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांची वेळेअभावी ते भेट घेऊ शकले नाही, हीच बाब हेरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडिया व विविध माध्यमांमध्ये याची मोठ्या प्रमाणात उलट सुलट चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आज पोहरादेवीला येऊन रामराव महाराजांचे दर्शन घेतल्याने सर्व चर्चांना चुटकीसरशी विराम दिला आहे.

अमित शहा हे 11 ऑक्टोबर रोजी पोहरादेवीला आले असता त्यांनी वेळेअभावी बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांची भेट घेतली नाही. महाराजांची भेट न घेतल्याने निवडणुकीच्या तोंडावर बरीच उलटसुलट चर्चा होऊन विरोधकांना आयतचं कोलीत मिळालं होतं.

दरम्यान, बंजारा परंपरेनुसार फेटा व शाल घालून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. रामराव महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या रामनवमीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोहरादेवी येथे आणण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्ष राजकारणी म्हणून विख्यात आहेत. आजच्या पोहरादेवी भेटीमुळे त्यांनी सर्वांनाच आपल्यातील राजकारणी प्रगल्भता दाखवून देत विरोधकांच्या भावनिक अपप्रचाराची हवाच काढून घेतली. मुख्यमंत्र्यांची ही भेट मतदारांमधील गैरसमज दूर करण्यात उपयुक्त ठरणार असून भवीष्यामध्ये पोहरादेवीला खूप काही देऊन जाईल एवढं मात्र निश्चित..

Loading...

बाळासाहेबांच्या विचारांचा नातवाला विसर? आदित्य ठाकरेंचा पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...