मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी 'मिसेस मुख्यमंत्री' उतरल्या मैदानात; केला हा दावा

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती देखील मागे नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2019 03:48 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी 'मिसेस मुख्यमंत्री' उतरल्या मैदानात; केला हा दावा

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,15 ऑक्टोबर: विधानसभा निवडणूक तोंडावर असताना प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती देखील मागे नाहीत. भाजप महिला आघाडीतर्फे मुख्यमंत्रीचा नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात महिला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याला अमृता फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होत्या. खरं तर या मतदारसंघात मुख्यमंत्री यांना प्रचाराची गरज नाही. त्यांच्या माणसांचा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त लीडने निवडून येतील, असे दावा अमृता फडणवीस यांनी यावेळी केला.

'मामूची मामी, करमणुकीची नाही कमी'

दरम्यान, राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातवरण आहे. सध्या राजकीय विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. हातवारे आणि नटरंगी टीकेनंतर आता एंटरटेनमेंटची टीका राज्यात धुमाकूळ घालत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसे समर्थकांनी हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे म्हणजे 'एंटरटेनमेंट.. एंटरटेनमेंट.. एंटरटेनमेंट..' असल्याचे अमृता यांनी म्हटले होते. आता यावरूनच मनसे समर्थकांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांचा बोटीवर सेल्फी क्लिक करणारा व्हिडिओ मनसे समर्थकांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी 'मामूची मामी, करमणुकीची नाही कमी', असे म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी अरबी समुद्रात क्रूझच्या टोकावर बसून काढलेल्या सेल्फीवरूनही वाद निर्माण झाला होता. त्याचाच व्हिडिओ आता वापरून ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणजे एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट… एन्टरटेनमेंट…’ असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात #मामूची_मामी_करमनूकीची_नाही_कमी असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 ऑक्टोबरला मुंबई-गोवा क्रूझ पर्यटन सुरू करण्यात आलं. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रूझच्या टोकावर जाऊन सेल्फी घेतला होता. तेव्हा त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. याच व्हिडिओचा वापर करून राज ठाकरे समर्थकांनी टीका केली आहे.

Loading...

मुख्यमंत्री फडणवीसांकडून नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 03:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...