संघ मुख्यालय परिसरात लागले बॅनर, भाजप कार्यकर्त्यांनी थेट केला आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसरात चक्क भाजप जातीपातीचे राजकारण करत असल्याचे बॅनर लागले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 05:39 PM IST

संघ मुख्यालय परिसरात लागले बॅनर, भाजप कार्यकर्त्यांनी थेट केला आरोप

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,3 ऑक्टोबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसरात चक्क भाजप जातीपातीचे राजकारण करत असल्याचे बॅनर लागले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केली आहे.नागपूर मध्यचे आमदार व उमेदवार विकास कुंभारे यांनी विरोधकांना शांत केल्याची माहिती मिळाली आहे.

नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रातून भाजप कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी नाराजी दिसून आली. विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने माजी महापौर प्रवीण दटके व त्यांचे समर्थकांमधून नाराजीचा सूर निघाला आहे. भाजप पक्षश्रेष्ठीकडून या निवडणुकीत नागपूर मध्यमधून नवा चेहरा अर्थातच प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली जाईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये होता. तसे न होता पुन्हा भाजप आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याला विरोध करत बुधवारी संघ मुख्यालय पासून 500 मीटर अंतरावर प्रवीण दटके समर्थकांनी बॅनर व घोषणाबाजी करत भाजपवर जातीपातीचे राजकारण करण्याचा थेट आरोप केला आहे.

काय म्हणाले विद्यमान आमदार..?

या सर्व बाबींवर विद्यमान आमदार व मध्य नागपूर विधानसभेचे उमेदवार विकास कुंभारे यांनी अशा गोष्टी राजकारणात घडत असून आपण त्यांची समजूत करून त्यांची नाराजी दूर करू, असे म्हटले आहे. या शिवाय प्रवीण दटके यांची नाराजी नसून त्यांच्या कार्यकर्त्याची नाराजी असल्याचे विकास कुंभारे यांनी सांगितले.

Loading...

हिंगणा येथे शिवसेना Vs राष्ट्रवादी..

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समीर समीर मेघे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. ते नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातून लढणार आहेत. समीर मेघे यांनी सहयोगी व कार्यकर्ते यांच्यासोबत रॅली काढून हिंगणा तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मागच्या 5 वर्षांत जी कामे करण्यात आली त्यावरून आशा आहे की वर्षी जिंकून येईल. त्यांचा सोबत शिवसेनेचे खासदर कृपाल तुमाने ही आले होते. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की समीर मेघे या हिंगणा मतदारसंघातून ते 50 हजार ते 70 हजार मतांनी जिंकून येईल. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेले विजय घोडमरे आणि समीर मेघे यांच्यात थेट लढत होणार आहे.

एकनाथ खडसेंबद्दल शरद पवारांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...