यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या या 5 किटकनाशकांवर बंदी

काही कंपन्या नियमांचं पालन न करता किटकनाशकांची निर्मिती करत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतात. ही किटकनाशकं अती विषारी आहेत. त्यांच्यात जे मिश्रण केलं जातं ते नियमांना धरून केलं जात नाही असं सरकारनं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 05:04 PM IST

यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या या 5 किटकनाशकांवर बंदी

मुंबई 19 सप्टेंबर : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात 2017मध्ये आणखी एक संकट ओढवलं होतं. किटकनाशकांमुळे जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेने देशभर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनी अखेर सरकार जाग आलीय. राज्य सरकारनं एक आदेश काढून 5 किटकनाशकांवर बंदी घातलीय. काही कंपन्या नियमांचं पालन न करता किटकनाशकांची निर्मिती करत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतात. या सुलतानी संकटामुळे शेतकरी आणखी अडचणीत येत होता. या घटनेनंतर सरकारने चौकशी समितीही नेमली होती. त्याचे अहवालही आले होते. यवतमाळ सोबतच अमरावती, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांमध्येही अशा घटना घडल्या होत्या.

यंदाच्या विधानसभेचं चित्र ठरवणार 'हे' 5 तरुण चेहरे

त्यानंतर अमरावती जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना त्याची बाधा झाली होती. अशा अनेक शेतकऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. ही किटकनाशकं अती विषारी आहेत. त्यांच्यात जे मिश्रण केलं जातं ते नियमांना धरून केलं जात नाही असं सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळे Profenophos, Fipronil, Acephate, Difenthiron, Monochrotophos या पाच किटकनाशकांवर बंदी घालण्यात आलीय. या किटकनाशकांची विक्री, वापर आणि वितरणावर बंदी असल्याचं सरकारनं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

'राम मंदिराबाबत काही जणांकडून वाचाळपणा सुरू', मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा?

मराठवाड्यात वादळाने शेतीचं नुकसान

Loading...

मराठवाड्यातील काही भागात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वारा आणि पाऊस झाला. पैठण तालुक्यातील पाचोड भागात सोसाट्याचा वारा आल्याने अनेक ठिकाणी बाजरी मका आणि कपाशी आडव्या झाल्या आहेत. केकत जळगावच्या प्रयागबाई बडे यांची 2 एकर बाजरी चांगली वाढली होती. मात्र गुरुवारी सकाळी आलेल्या वादळाने त्यांची बाजरी आडवी झाली. या बाजरीला चांगला भाव येईल असं त्यांना वाटत होतं मात्र त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. मात्र तासाभराच्या वाऱ्याने तिच्या अपेक्षा आडव्या झाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...