लग्नाला विरोध केल्यानं प्रेमीयुगुलाची आत्महत्या!

लग्नाला विरोध केल्यानं प्रेमीयुगुलाची आत्महत्या!

या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्याला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय.

  • Share this:

गोंदिया 17 सप्टेंबर : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कणेरी नाल्यामध्ये प्रेमीयुगलाने  आत्महत्या केली असून त्यांचे प्रेत  कुजल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतकांमध्ये संदीप यशवंत कावळे वय 23 वर्षे व एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. कनेरी नाल्या जवळ दुर्गंध येत असल्याने गावकऱ्यांनी त्याचा शोध  घेतला असता एका युवक युवतीचं प्रेत कुजल्या अवस्थेत दिसलं. गावकऱ्यांनी याची माहिती तातडीनं दुग्गीपार पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या तपासात   दोन्ही मृतकांची ओळख पटली असून मुलाचं नाव संदीप यशवंत कावळे तर मुलगी अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालंय.  या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्याला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने जागीच नातेवाईकांच्या समक्ष पोस्टमार्टम करण्यात आलंय.

SPECIAL REPORT: 78 वर्षांच्या पवारांची तरुणांनाही लाजवेल अशी फटकेबाजी

7वीच्या विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

विद्यार्थी आणि शिक्षिकाचं नातं हे पवित्र आणि प्रेमाचं समजलं जातं. मात्र मुंबईत अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका अल्पवयीन मुलाने आपल्या ट्युशनच्या शिक्षेकेची हत्या केल्याचं उघड झालंय. किरकोळ कारणांवरून त्याने शिक्षेकेवर हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. त्यात त्या शिक्षिकेचा मृत्यू झाला. रागाच्या भरात केलेल्या या हल्ल्याने त्या विद्यार्थ्याने शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासलीय. मुंबईतल्या गोवंडी परिसरात ही घटना घडली असून या घटनेने सर्व परिसर हादरून गेलाय.आयेशा अस्लम हुसिये (वय 30) या शिक्षिका गोवंडीतल्या शिवाजीनगर परिसरात राहतात. आयेशा या ट्युशन घेऊन आपलं घर चालवत होत्या. त्यांच्याकडे आरोपी मुलगा (वय 12) हा ट्युशनला येत असे. तो सातव्या वर्गात होता अशी माहिती दिली जातेय.

शिवसेनेत प्रवेश करणार का? उर्मिला मातोंडकरांनी दिलं हे स्पष्टीकरण!

त्याने आयेशांकडे काही पैशांची मागणी केली. आपल्या आईला घरात काही सामान आणयचं आहे त्यासाठी पैसे हवे असल्याचं त्याने आयेशा यांना सांगितलं. मात्र आपल्याकडे पैसे नाहीत असं शिक्षिकेने सांगितल्यानंतर या मुलाला राग आला. काही वेळात तो पुन्हा त्यांच्याकडे चाकू घेऊ आला आणि पैशाची मागणी करत तो वाद घालू लागला. शिक्षिकेने पुन्हा नकार देताच त्याने आपल्या जवळच्या चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. शिक्षिकेच्या पोटात आणि पाठिवर त्याने सपासप वार केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 08:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading