नागपुरातील प्रेमीयुगुलाने शेगावात येऊन केली आत्महत्या, केले विष प्राशन

नागपुरातील प्रेमीयुगुलाने शेगावात येऊन केली आत्महत्या, केले विष प्राशन

हे जोडपे दोन दिवस सोबत राहिले....

  • Share this:

बुलडाणा,10 ऑक्टोबर: नागपूर येथील प्रेमीयुगुलाने गजानन महाराजांच्या शेगावात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये प्रेमीयुगुल मृतावस्थेत आढळून आले. नंदू कृष्णाजी मसराम (वय-40, रा.गोंधणी धामणा, नागपूर) आणि भारती कैलास सुरपाम (वय-30, रा. सालई गोंधणी धामणा, नागपूर) असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सालई गोंधणी धामणा, नागपूर येथील रहिवासी असलेले नंदू कृष्णाजी मसराम आणि भारती कैलास सुरपाम या प्रेमी युगलाने 5 ऑक्टोबर रोजी शेगाव येथे येऊन एका खासगी हॉटेलमध्ये 205 क्रमांकाची खोली भाड्याने घेतली होती. नंदू आणि भारतीने गेस्ट हाऊसमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दोन दिवस राहिले सोबत..

गेस्ट हाऊस मालकाने सांगितले की, हे जोडपे दोन दिवस सोबत राहिले. मात्र, सोमवारी सकाळपासून ते राहत असलेल्या 205 क्रमांकाच्या खोलीतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने खोलीत जाऊन पाहणी केली असता दोघेही पलंगावर मृतावस्थेत आढळून आले. हॉटेल मालकाने तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहे. या दोन्ही मृतांच्या नातेवाइकांना नागपूर पोलिसांच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. प्रकरणी शहर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पती आमदार व्हावा यासाठी अनवाणी पायांनी चालल्या 3 किमी नवनीतकौर राणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2019 03:47 PM IST

ताज्या बातम्या