नागपूर 20 मार्च : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागपूरातही प्रशासनाने तयारी केलीय. पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. नागपूरात सध्या कोरोनाचे 4 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन होऊ शकते असे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. ‘लॉकडाऊन’ म्हणजेच संचारबंदीसारखी स्थिती. लोकांनी गर्दीत जाऊ नये आणि गर्दीही करू नये असं आवाहनही त्यांनी केलं.
नागपूर मेडिकल कॉलेज आणि अन्य ठिकानी लोकांना कॉरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन पूर्ण खबरदारी घेत आहे. मात्र लोकांनी आपणहून काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं.
देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात आज तब्बल 50 नव्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात सर्वाधिक संख्या ही केरळमधली असून त्यात 12 जणांचा समावेश आहे. यामध्ये 5 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. मुन्नारमधल्या एका रिसॉर्टमध्ये ते थांबले होते. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला होता. कोची विमानतळावर असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. एर्नाकुलमध्ये 5, कारगौडमध्ये 6 तर पलक्कड जिल्ह्यात एकाचा समावेश आहे. गुरुवारपर्यंत देशात 173 कोरोनाबाधित होते. त्यात दिवसभरात 50 नव्या रुग्णांची भर पडली असून ती संख्या आता 223 वर गेली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावावर पुण्यात पेट्रोल डिलर असोसिएशनचा मोठा निर्णय
बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कनिका ही काही दिवसांपूर्वीच लंडनहून परतली होती. त्यानंतर ती लखनऊमध्ये झालेल्या एका मेजवानीत उपस्थित होती. त्या मेजवानीला राजकारण आणि इतर क्षेत्रातले 300 दिग्गज उपस्थित होते असं सांगितलं जात आहे.
कोरोनाच्या भीतीने पुण्याहून गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाची घाला, आईसह 2 मुली ठार
त्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे याही उपस्थित होत्या. कनिका ही पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाल्याने वसुंधराराजे यांनी मुलगा दुष्यंत यांच्यासह आपण क्वारंटाइन झाल्याचं जाहीर केलंय.