VIDEO: सावधान! या कारणांमुळे ग्रामीण भागात कोरोना पसरण्याचा धोका

VIDEO: सावधान! या कारणांमुळे ग्रामीण भागात कोरोना पसरण्याचा धोका

40 डिग्री पेक्षा जास्त उन्ह, प्रचंड गर्दी यामुळे लोकांना तासं तास तळपत्या उन्हात रांगेत उभे राहावं लागतं आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्यता उघड झाला आहे.

  • Share this:

पुसद 09 मे: कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी करू नका असं सरकार वारंवार सांगत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राज्यातल्या ग्रामीण भागात तुलनेने कमी लागण झाली आहे. परिस्थिती अशीच ठेवण्यासाठी लोकांनी गर्दी करू नये असा नियम असताना रेड झोनमध्ये असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातला गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तालुक्यातली मोठी बाजारपेठ असलेल्या काळी दौलतखान या गावातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अधिकाऱ्यांनी कुठलच नियोजन केलं नसल्याने लोकांनी पैसे काढण्यासाठी तुफान गर्दी केली.

ग्रामीण भागात आता शेतीची कामं सुरू आहेत. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना विविध मदत म्हणून पॅकेजेसची घोषणा केली होती. त्याचे पैसे आता बँकेत जमा होत आहेत. ते काढण्यासाठी शेतकरी बँकेत येत आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नियम कोटेकोरपणे पाळा असं सांगितलं जात असताना देखील बँकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलेही नियोजन केलं नसल्याचं उघड झालं आहे.

हे वाचा - माजी मुख्यमंत्री व्हेंटिलेटरवर; अचानक आला Heart Attack

40 डिग्री पेक्षा जास्त उन्ह, प्रचंड गर्दी यामुळे लोकांना तासं तास तळपत्या उन्हात रांगेत उभे राहावं लागतं आहे.

प्रत्येक गावा प्रमाणे टोकन सिस्टिम करणं, प्रत्येक गावाला ठराविक दिवस देणं अशा गोष्टी करता येऊ शकतात मात्र कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे. असंच राहिलं तर कोरोनाचटा व्हायरस पसरण्यास वेळ लागणार नाही अशी भीतीही व्यक्त होत आहे.

हेही वाचा -

चप्पल तुटली तरी थांबला नाही प्रवास! पायात पाण्याच्या बाटल्या बांधून धरली वाट

राज्याला 1 लाख 40 हजार कोटींचा फटका बसणार, तज्ज्ञगटाच्या अहवालातील मोठ्या गोष्टी

 

First published: May 9, 2020, 3:35 PM IST

ताज्या बातम्या