नागपूर: ‘सगळं होतं नव्हतं पाण्यात गेलं…’ 500 शेतकऱ्यांची मन हेलावून टाकणारी कहाणी

'शेतीवरच आमचं पोट आहे. सगळं होतं नव्हतं ते पाण्यात गेलं. आता जगण्याला अर्थच उरला नाही.'

'शेतीवरच आमचं पोट आहे. सगळं होतं नव्हतं ते पाण्यात गेलं. आता जगण्याला अर्थच उरला नाही.'

  • Share this:
नागपूर 02 नोव्हेंबर: पाऊस परतून आता काही दिवस झालेत तरी  रामटेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या (Ramtek Farmers) शेतात अजुनही पाणीच आहे. हे पाणी आहे तलावाचं. तलावाच्या काठी शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांच्या जगण्याचाच प्रश्न उभा ठाकला असून त्यांची व्यथा हे मन हेलावून टाकणारी आहे. त्यातून तातडीने मार्ग काढण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. शेतीवरच आमचं पोट आहे. सगळं होतं नव्हतं ते पाण्यात गेलं. आता जगण्याला अर्थच उरला नाही अशी मन हेलावून टाकणारी व्यथा या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. रामटेक येथील शेतकरी पैसे भरून खिंडसी तलावाकाठची जमीन लिलावात घेतात आणि त्या जागी शेती करतात. भात हे त्यांचं मुख्य पीक. मात्र यावर्षी पाऊस जास्त झाल्याने पाण्याची पातळी वाढली आणि त्या पाण्याने सगळा परिसरच व्यापून घेतला. त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांची शेतं पाण्यात गेली आहेत. हे सगळे शेतकरी आज पाण्यात उतरले होते. त्यांनी घोषणाबाजी करत सरकारचं लक्षं वेधलं, मात्र पोलिसांनी सगळ्यांची समजूत काढून पाण्याच्या बाहेर काढण्यात यश मिळवलं. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सध्या तिथे शेती करणे कठीण झाले आहे. सरकारने तात्काळ तलावातील पाणी कमी करून शेत जमिनी पिकांसाठी मोकळ्या कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर खिंडसीच्या तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. खिंडसी तलावातील शेतजमीन लिलावात घेऊन 500 शेतकरी लिजवर घेतलेल्या शेतजमिनीवर शेती करतात मात्र तलावातील पाण्याची पातळी क्षमतेपेक्षा अधिक वाढविल्याने शेती क्षेत्र पाण्यात बुडाले आहे. या जमितीतून पीक घेत उदरनिर्वाह करणारे परीसरातील 25 गावातील शेतकरी संकटात अडकले आहेत. 'जगावे की मरावे' हा एकच प्रश्न आमच्या समोर असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना जगण्यासाठी खिंडसी तलावातील उपलब्ध साठ्याची पातळी कमी करणे गरजेचे आहे.ते व्हा जलसाठा कमी करून शेतकऱ्यांना शेती करण्यास जागा मोकळी करून दयावी अन्यथा शेकडो शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचं निवेदन रामटेक उपविभागीय अधिकारी यांना शेतकऱ्यांकडून देण्यात आले आहे. सध्या स्थितीत तलावातील पाणी कमी करून 1025 CLR एवढ्या पातळीवर ठेवले तर पुढील काळात काहीतरी तुटपुंजे उत्पन्न काढून शेतकरी उपजीविका करण्यासाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे खिंडसी तलावातील पाणी आतातरी 1025 CLRवर नियंत्रित करून पाण्यात बुडलेली शेतजमीन मोकळी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जलसमाधी आंदोलना वेळी शेकडो शेतकऱ्यांनी दिला.
Published by:Ajay Kautikwar
First published: