गणेश चतुर्थीच्याच दिवशी अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला, यवतमाळमध्ये खळबळ

तरुणी या परिसरातून जात असताना जीवन तीच्या जवळ आला आणि त्याने चाकूने वार करायला सुरूवात केली. या हल्ल्याने तरुणी प्रचंड घाबरून गेली होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 09:33 PM IST

गणेश चतुर्थीच्याच दिवशी अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला, यवतमाळमध्ये खळबळ

यवतमाळ 2 सप्टेंबर : यवतमाळमध्ये एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केलाय. घटनेनं शहरात खळबळ उडालीय. या हल्ल्याचं नेमकं कारण पुढं आलं नसलं तरी एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. शहरातला गजबजलेला परिसर असलेल्या ट्रॅव्हल पॉइंट इथं हा प्रकार घडला. पीडित तरुणी 12 वीत शिक्षण घेत असून ती वर्ध्यातून यवतमाळला शिक्षणासाठी आली होती. हल्लेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंयय जीवन चौधरी असं हल्लेखोराचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. तरुणी या परिसरातून जात असताना जीवन तीच्या जवळ आला आणि त्याने चाकूने वार करायला सुरूवात केली. या हल्ल्याने तरुणी प्रचंड घाबरून गेली होती. नंतर काही लोकांनी तिला बाजूल केलं आणि हल्लेखोर आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस आता घटनेचा तपास करत आहेत.

भाजपचे 'हे' दोन दिग्गज नेते शिवसेनेशी जागावाटपावर चर्चा करणार!

हरितालिका विसर्जन जीवावर बेतले

हिंगणघाट येथे हरितालिका गौरी विसर्जन करताना तोल जाऊन दोन महिला आणि दोन लहान मुलं असे चार जण वणा नदी पात्रात बुडाल्याची  घटना दुपारी घडली. यात पोलीस कर्मचारी तातडीनं मदतीला धावल्याने वाहून जात असलेल्या एका महिलेला पोलीस कर्मचाऱ्यान बाहेर काढलं. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं तर एक महिला व दोन लहानगे असे तिघे बेपत्ता आहेत. एनडीआरएफच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जातोय. घटनास्थळी पोलीस,आमदार व जिल्हाधिकारी दाखल झाले आहे.

प्रियकरासमोरच प्रेयसीचा शॉक लागून मृत्यू

Loading...

आज दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घरी गौरी पूजन करून शास्त्री वार्डातील काही महिला वणा नदी रेल्वे पुलाजवळ  कवडघाट घाटावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत दोन मुलंही होती.  विसर्जन करताना एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडला. तो वाहून जात असताना त्याची बहिणही त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात गेली. तीला वाचवण्यासाठी त्यांच्या आईने नदीत उडी घेतली आणि त्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या एका महिलेने वाचविण्यासाठी पाण्यात गेल्या. या प्रयत्नात सर्वच जण वाहून गेले.

'युती'चा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार', शिवसेनेची गुगली!

रिया रंजित भगत ( 35) यांच्या सोबत अभी ( 10) व अंजना ( 13)  ही दोन मुलं सोबत होती.  आई सोबत नदीपात्रात गेलेला अभी वाहू लागल्याने बहीण अंजना त्याला वाचविण्यासाठी धावली तीही पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तिची आई रिया भगत ने धाव घेतली. या तिघांना वाहताना पाहून शेजारच्या दिपाली मारोती भटे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ती सुद्धा पाण्यात वाहू लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 09:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...