Elec-widget

अंबाझरी तलावात पोहण्यासाठी उतरलेला IT इंजिनिअर बुडाला

अंबाझरी तलावात पोहण्यासाठी उतरलेला IT इंजिनिअर बुडाला

नागपुरच्या अंबाझरी तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या मुळ मुंबईच्या राहाणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,22 सप्टेंबर:नागपुरच्या अंबाझरी तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या मुळ मुंबईच्या राहाणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. आनंद दिवेदी असे तरुणाचे नाव असून तो नागपुरात आयटी पार्कमध्ये नोकरीला होता. रविवारी सुटी असल्यामुळे हर्षल सकाळीच मित्रांसोबत अंबाझरी तलाव परिसरात पर्यटनासाठी आला होता.

अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याचा आनंद लुटण्यासाठी आनंद हा आपल्या दोन मित्रांसोबत पाण्यात पोहायला उतरला. काही वेळातच हर्षल दिसेनासा झाल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच शोध घेण्यात येत आहे. अखेर आनंद पाण्यात बुडाल्याचे समोर आले आहे. आनंदचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. आनंदचा मृतदेह सापडला असून पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

खड्ड्यांमुळे अॅम्ब्युलन्सला उशीर, एकाचा मृत्यू

दरम्यान, नागपुर शहरातील रस्ते चिखलात हरवले आहेत. धक्कादायक म्हणजे रस्त्यावरीस खड्ड्यांमुळे अॅम्बुलन्सला उशीर झाल्याने तसेच वेळेत उपचार न मिळाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भूषण टोळ(वय-40) असे या व्यक्तीचे नाव आहे. अखेरीस नागरिकांनीच तो जीवघेणा खड्डा स्वतः बुजवला.

Loading...

भूषण टोळला आला होता हार्ट अॅटॅक...

शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे अक्षरश: चाळणी झाली आहे. अशात एका खड्ड्यात एक सप्टेंबरच्या मध्यरात्री एक अॅम्बुलन्स अडकली होता. भूषण टोळ यांना हार्ट अॅटॅक आला होता. त्यांना रुग्णालयात नेताना अॅम्बुलन्स रस्त्यावरील खड्ड्यात तब्बल अर्धा तास अडकून पडली होती. लोकांनी मिळून अॅम्बुलन्स उचलून धरत ती बाहेर काढली आणि भूषण यांना रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र, या सर्व कसरतीमध्ये अर्धा तास वाया गेला होता. परिणामी रुग्णालयात उपचार चालू असताना भूषण यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हा प्रशासनाने घेतलेला बळी असल्याचा आरोप वैशाली अस्कर यांनी केला आहे.

VIDEO: रस्त्यावर उभ्या असलेल्या कारनं घेतला पेट, परिसरात धुराचे लोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2019 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...