Home /News /maharashtra /

लॉकडाउनमुळे विदर्भातल्या तरूणाला करावी लागली 125 किलोमीटर पायपीट

लॉकडाउनमुळे विदर्भातल्या तरूणाला करावी लागली 125 किलोमीटर पायपीट

गावाकडे जाण्यासाठी सर्व मार्ग बंद होते. नागपूरला राहण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्याने चालत जाण्याचा निर्णय घेतला. आणि 125 किलोमीटर पायपीट करत सिंदेवाही गाठलं.

  चंद्रपूर 26 मार्च : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व देशातली वाहतूक ठप्प झालीय. विमानसेवा, रेल्वे सेवा, बस वाहतूक सगळं काही बंद आहे. लोकांनी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी सुरक्षित राहावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. या लॉकडाउनमुळे हातवर पोट असणाऱ्यांना मोठा फटका बसला. तर कामानिमित्त दुसरीकडे गेलेल्या मजुरांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. कामानिमित्त अहमदनगरमध्ये गेलेल्या सिंदेवाहिच्या तरुणाला आपलं घर गाठण्यासाठी तब्बल 125 किलोमीटर चालावं लागलं. शेवटी त्याच्या मदतीला पोलीस धावून आले. नरेंद्र शेळके असं त्या तरुणाचं नाव आहे. सावली तालुक्यातलं जांब हे त्याचं गाव. नरेंद्र हा नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे साखर कारखान्यात मजूर आहे. कोरोना लॉकडाउमुळे तो तीन दिवसांपूर्वीच नागपूरला आला होता. मात्र गावाकडे जाण्यासाठी सर्व मार्ग बंद होते. नागपूरला राहण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्याने चालत जाण्याचा निर्णय घेतला. आणि 125 किलोमीटर पायपीट करत सिंदेवाही गाठलं. त्यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यावेळी त्याने त्यांना सर्व कहाणी सांगितली. त्यानंतर सिंदेवाही पोलिसांनी त्याच्या जेवणाची व्यवस्था केली आणि त्याच्या गावीही पोहोचून दिलं. पोलिसांच्या या माणुसकीचं सगळीकडे कौतुक होत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्व देश एक प्रकारे घरातच बदिस्त झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखायला असेल तर लॉकडाउन हा सर्वात मोठा उपाय आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. सध्यातरी त्याच्याशिवाय मार्ग नाही असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

  नांदेडमध्ये गुरुव्दारा दर्शनासाठी आलेले 3 हजार भाविक अडकले

  कोरोना हा एका माणसातून दुसऱ्यामध्ये संक्रमीत होते. त्यामुळे त्याची साखळी तोडणं आवश्यक असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सूचनेनुसार तीन आठवड्यांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. आजचा लॉकडाउनचा दुसरा दिवस आहे. पण कोरोनाचा प्रसार थांबला नाही तर लॉकडाउन वाढवला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  'आता फक्त 'हे' 3 पर्याय आहेत', अमोल कोल्हेंनी करून दिली गंभीर धोक्याची जाणीव

  लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने हातावर पोट असणाऱ्या गरीबांसाठी मोठी घोषणा केली. धान्य आणि थेट त्यांच्या बँक खात्यात पैसेही जमा होणार आहेत. हे पुढचे तीन महिने राहणार असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या