ऐन गणेशोत्सवात कारंजात मोठा शस्त्रसाठा जप्त...

ऐन गणेशोत्सवात कारंजात मोठा शस्त्रसाठा जप्त...

कारंजा शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून तिघांना जेरबंद करण्यात आले आहे.

  • Share this:

किशोर गोमाश,(प्रतिनिधी)

वाशिम, 7 सप्टेंबर: जिल्ह्यातील कारंजा शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. एलसीबी व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. ऐन गणेशोत्सवात शस्त्र सापडल्याने कारंजा शहरात खळबळ उडाली आहे. कारंजा शहरातील हबिब नगरात तसेच आस्ताना परिसरातील घरामधून तीन तलवारी, दोन गुप्त्या, चार चाकू व पाच लोंखडी पाईप असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकार, पोलिस उपनिरीक्षक भगवान पायघन व पोलिस कर्मचारी तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

कीटकनाशकाची फवारणी करताना दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

शेतात कीटकनाशकांची फवारणी करतानी विदर्भात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील आसेगाव बाजार येथे रणजीत दादाराव धांडे या तरुण शेतमजुराचा मृत्यू झाला. 7 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रणजीत दादाराव धांडे हा तरुण शेतात पिकावर कीटकनाशक फवारणी करत होता. त्यातून विषबाधा झाली. त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रणजीतची प्राणज्योत मालवली. रणजीतच्या मृतदेहाचे रविवारी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येईल. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला. याबाबत माहिती मिळेल, अशी माहिती सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसूमाकर घोरपडे यांनी दिली आहे.

दुसरी घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरी पठार येथे घडली आहे. शेतास कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन

गजानन डोंगर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. गजानन डोंगर यांच्याकडे 7 एकर शेती असून त्यात त्यांनी कपाशीची लागवड केली होती. शेतात ते फवारणी करत असतानी त्यांना विषबाधा झाली. त्यांना आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे आणण्यात आले. मात्र, तिथे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, विदर्भात आतापर्यंत 46 लोकांना विषबाधा झाली आहे. सध्या 15 शेतकऱ्यांवर यवतमाळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

VIDEO:आम्हीही ऐकून घेणार नाही, जलील यांचा 'वंचित'वर पलटवार

Published by: Sandip Parolekar
First published: September 7, 2019, 10:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading