कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच अवैध दारू विक्रेत्याचा हल्ला

आता आपलं बिंग फुटणार हे त्यांच्या लक्षात येताच गुत्तेदाराने धार धार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 09:08 PM IST

कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच अवैध दारू विक्रेत्याचा हल्ला

हैदर शेख, चंद्रपूर 26 ऑगस्ट :  बल्लारपूर तालुक्यातील कवडजई जंगलात अवैध मोहदारू विक्रेत्याने पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला केलाय. या हल्ल्यात कोठारीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके जखमी झालेत. जंगलात अवैध मोहदारू निर्मिती होत असल्याची माहिती अंबिके यांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी अंबिके हे आपल्या पथकासोबत जात होते. ते आणि त्यांचं पथक घटनास्थळी पोहोचताच गुत्तेदाराने हल्ला केला. या हल्ल्यात अंबिके जखमी झाले.

संतोष अंबिके आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचताच त्यांना तिथे मोठ्या प्रमाणावर दारू तयार होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता आपलं बिंग फुटणार हे त्यांच्या लक्षात येताच गुत्तेदाराने धार धार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला होत असतानाच अंबिके यांनी आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.  ते असा प्रयत्न करत असतानाच गुत्तेदाराने त्यांच्या अंगावर कुऱ्हाड फेकली. ही कुऱ्हाड त्यांच्या डोक्याला लागली.

बँक घोटाळा प्रकरण: अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

अंबिके यांना चंद्रपूरातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर गुत्तेदार आणि त्याचे साथीदार पळून गेले. पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना शोधण्याची माहीम सुरू केलीय.

गुरांच्या दानाने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

Loading...

पुणे- महापूराने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले. शेती वाहून गेली. डोक्यावरचं हक्काचं छप्पर उडालं. घरातलं होतं नव्हतं ते सगळं भिजून गेलं. सगळ्यात जास्त परवड झाली ची गुराढोरांची. हा सगळा परिसर दुध-दुभत्यांचा आहे. शेकडो शेतकऱ्यांच्या उपजिविकेचं ते साधन आहे. या महापूरात तब्बल 9 हजार जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेकांचं उपजिविकेचं साधनच हिरावलं गेलं. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून मदत आली. या मदतील भोसरीकरांनीही आपला वाटा उचलला. त्यांनी केलेली मदत मदत ही अनोखी असून ही मदत आहे ती पशुधनाची. या अनोख्या मदतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेत ही मदत केली आहे.

बँक घोटाळा प्रकरण: अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

कोल्हापूर आणि सांगली मध्ये आलेल्या महापूरात पीकांची हानी न मोजता येणारी होती. पण शेतकऱ्यांना सगळ्यात चटका लावून गेला तो जनावरांचा मृत्यू. जीवापाड प्रेम केलेलं पशुधन गेल्यानं शेतकऱ्यांना धक्का बसला. यातली बहुतांश जनावरं ही दुभती असल्याने शेतकऱ्यांसाठी ती सर्वात मोठी हानी आहे. पूरग्रस्तांना अन्य धान्यांची मदत मिळाली मात्र पशुधनाची मदत फारशी मिळत नाही त्यामुळे भोसरकरांनी एकत्र येत 300 गाई-म्हशींचं दान करण्याचा निर्णय घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 09:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...