जमिनीवरून वाद, दाम्पत्याची निर्घृण हत्या, धारदार शस्त्राने केले वार

जमिनीवरून वाद, दाम्पत्याची निर्घृण हत्या, धारदार शस्त्राने केले वार

  • Share this:

भास्कर मेहरे,(प्रतिनिधी)

यवतमाळ,7 डिसेंबर: यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हे दुहेरी हत्याकांड करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. रघुनाथ हरिदास जाधव (50) आणि अनुसया रघुनाथ जाधव (45, रा.तिवसा) असे मृतांची नावे आहेत.

जमिनीच्या वादातून हत्या.. 

मिळालेली माहिती अशी की, दारव्हा रोडवरील तिवसा गावात जमिनीच्या वादातून पती-पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन आरोपीला लाडखेड पोलिसांनी अटक केली आहे. 

लाडखेड पोलीसअंतर्गत येणाऱ्या दारव्हा रोडवरील तिवसा गावात मागील काही दिवसांपासून शेजारी राहणाऱ्या जागेचा वाद होता. शनिवारी याच मुद्द्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला. वाद विकोपाला जाऊन रघुनाथ जाधव यांच्यासह त्यांची पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. लालखेड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

दिव्यांग महिलेच्या खून प्रकरणाचा लागला छडा..

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यानातर्गत खेर्डा या गावात 50 वर्षीय लीलाबाई खरात नामक दिव्यांग महिलेचं निर्वस्त्र अवस्थेत प्रेत आढळून आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत श्वानाच्या मदतीने घरा शेजारीच राहणाऱ्या रितेश देशमुख नामक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करून कारवाईही सुरू केली आहे.

महिलेचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आलेच दिसून येत होतं. दरम्यान, घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी जळगाव पोलिसांना दिल्या नंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामकरून पोलीस श्वानाला पाचारण करण्यात आले होते. तर दुसरीकडे, गुप्त माहिती आणि श्वानाने शेजारच्या घरात दिशा दाखविल्याने या प्रकरणी रितेश देशमुख नामक इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने पोलीस तपासादरम्यान आपल्या पतीने रात्री लीलाबाईचा खून करून आल्याचं आपल्याला सांगितलं होतं. एवढंच नाहीतर त्याने स्वतःच्या हाताने कपडेही धुतले होते, अशी माहितीही तिने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या