गृहमंत्री अनिल देशमुखांसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

गृहमंत्री अनिल देशमुखांसह खासदार नवनीत राणा यांची कोर्टानं केली निर्दोष मुक्तता

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन मिळालं होती.

  • Share this:

अमरावती, 31 ऑक्टोबर: लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Election 2019) काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा (Amravati MP Navneet Kaur Rana) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा सत्र कोर्टानं अनिल देशमुख आणि नवनीत कौर राणा यांच्यासह 16 जणांची दोष मुक्त केलं.

खासदार नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह 16 जणांवर अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 188 अंतर्गत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा..भाजपला खिंडार! 257 बुथ प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन मांडली वेगळी चूल

या खटल्यावर निर्णय देताना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एफ.ए. देशपांडे यांनी सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केले. फिर्यादी पक्षानं या प्रकरणी थेट न्यायालयात धाव न घेता पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षानं केलेली याचिका कोर्टानं रद्दबातल ठरवत, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन मिळालं होती. नवनीत कौर राणा यांना भव्या रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बाबा राठोड, हर्षवर्धन देशमुख, गणेश खारकर, संगीता ठाकरे, अभिनंदन पेंढारी, पुष्पाताई बोंडे, सुनील वऱ्हाडे, रामेश्वर अभ्यंकर, गणेश राय, जितु दुधाने, ज्योती सैरासे, प्रशांत कांबळे,. रसीद खा हिदायत खा आदी यावेळी उपस्थित होते. नवनीत कौर यांनी आदर्श आचारसंहीतेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक नियंत्रण कक्षाचे फ्लाईंग स्कॉड अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी गाडगे नगर पोलिस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू असताना रॅली काढून आचारसंहीतेचा भंग केल्याप्रकरणी नवनीत कौर राणा, अनिल देशमुख यांच्यासह 16 जणांविरुद्ध भादंवि कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा...सर्वात मोठं मनोमिलन! उदयनराजे आणि रामराजे यांची अचानक झाली भेट

या प्रकरणी 17 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. मात्र, निवडणूक नियंत्रक अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी या प्रकरणी थेट न्यायालयात धाव न घेता पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षानं केलेली याचिका कोर्टानं रद्दबातल ठरवत, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2020, 9:16 PM IST

ताज्या बातम्या