भानामती: एकाची निर्घृण हत्या, रक्ताने माखलेल्या कपड्यावरच झोपला आरोपी

भानामती: एकाची निर्घृण हत्या, रक्ताने माखलेल्या कपड्यावरच झोपला आरोपी

  • Share this:

हिंगोली,14 डिसेंबर: पारडा येथे भानामतीच्या प्रकारातून एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शंकर साधू अलझेंडे (वय-55) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता.13) बासंबा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शंकर अलझेंडे यांचा तिघांनी खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. एक आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पकडले तर दुसरा चक्क रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी घरात झोपला होता. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. तर तिसरा आरोपी फरार झाला आहे.

नागनाथ किरण गोविंदपुरे आणि संतोष तोडकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तर बाळू उर्फ सिद्धेश्वर तोडकर असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी भानामतीचा संशय व्यक्त केला आहे. नागनाथ गोविंदपुरे याच्या पत्नीची प्रकृती मागील काही दिवसांपासून खराब होती. त्यांच्यावर औषधोपचार करूनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या शंकर अलझेंडे याने भानामती केली असावी, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळे तिघांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील शंकर साधू अलझेंडे (वय-55) हे मागील काही दिवसांपासून घरी एकटेच होते. त्यांचे कुटुंबीय कामाच्या शोधात बाहेरगावी गेले आहे. गुरुवारी (ता.12) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावातील नागनाथ किरण गोविंदपुरे, संतोष तोडकर व अन्य एकाने अलझेंडे यांना घरातून बाहेर बोलावून त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. लोखंडी रॉडने डोक्यात वार केले तर त्यांच्या छातीवर, पोटावर लाथा मारल्या. त्यामुळे त्यांच्या किडनीला दुखापत होऊन पोटातच रक्तस्त्राव झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी शंकर अलझेंडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पहाटे तीन वाजता पोलिसांचे पथक पुन्हा पारडा गावात गेले. या वेळी पोलिसांनी नागनाथ गोविंदपुरे याच्या घरातून त्यास ताब्यात घेतले. तो बॅग भरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत होता. तर संतोष तोडकर हा रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी घरात झोपला होता त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर बाळू उर्फ सिद्धेश्वर तोडकर हा मात्र फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 04:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading