हिंगणघाट पीडिता व्हेंटीलेटरवर, ताज्या मेडिकल बुलेटीनने चिंता वाढवली

हिंगणघाट पीडिता व्हेंटीलेटरवर, ताज्या मेडिकल बुलेटीनने चिंता वाढवली

पीडितेवर उद्या एक शस्त्रक्रियाही करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

  • Share this:

नागपूर 8 फेब्रुवारी : हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पीडित प्राध्यापिकेची मृत्यूशी झुंज अजुन सुरुच आहे. घटनेला आज 6 दिवस होत आहेत. तिच्यावर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र तिच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने आज तिला व्हेंटीलेटरवर टाकावं लागलं अशी माहिती तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर दर्शन रेवणवार यांनी दिलीय. उद्या तिच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर रेवणवार यांनी दिली. तिचं आज मेडिकल बुलेटीन जारी करण्यात आलंय.

आगीमुळे तिची श्वसननलिका जळाली गेली. त्यामुळे तिला त्रास होत असून डॉक्टर प्रयत्नांशी शर्थ करत आहेत. पीडिता सध्या शुद्धीवर असून बोलण्याला थोडा प्रतिसादही देत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, आरोपी आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

भरधाव दुचाकीचा चिडलेल्या हत्तीनं केला पाठलाग, पुढे काय झालं तुम्हीच पाहा VIDEO

त्याच्या विरुद्ध नागरीक आक्रमक असल्याने त्याला पहाटे 6 वाजताच न्यायालयात हजर करण्यात आलं. सकाळी पहाटेदरम्यान न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गुप्तता पाळत हजर केलं. एमसीआर देत आरोपीची जेलमध्ये रवानगी झाल्याची माहिती आहे. पोलीस याबाबत गमालीची गुप्तता पाळत आहेत.

हेही वाचा...

हिंगणघाट : नागरीक आक्रमक, पोलिसांनी आरोपीला सकाळी 6 वाजताच केलं कोर्टात हजर

CORONA रुग्णाच्या शेजारी केवळ 15 सेंकद उभा होता हा व्यक्ती, आता परिस्थिती गंभीर

संभाजी भिडेंविरोधात अटक वॉरंट, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hinganghat
First Published: Feb 8, 2020 12:16 PM IST

ताज्या बातम्या