हिंगणघाट 04 फेब्रुवारी : एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून हे कृत्य करणाऱ्या त्या नराधमालाही पेट्रोल टाकून जाळा अशी मागणी तिच्या आईने केलीय. सरकारने पीडितेला मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. तर या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंगणघाटमध्ये मोर्चा निघाला होता. त्यावेळी संतप्त महिलांनी त्या नराधमाला आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्याला आमच्याकडे सोपवा आम्ही त्याला शिक्षा देतो अशी मागणी या महिलांनी केलीय.
काल झालेल्या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के भाजली होती. तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून पुढचे 48 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. श्वासनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतोय.
व्यंगचित्र का काढत नाहीत राज ठाकरे? पुण्याच्या कार्यक्रमात केला खुलासा
तिच्या डोळ्यालाही दुखापत झालीये. तिच्या चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेलाय. त्यामुळे तिची परिस्थिती गंभीर आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होतोय. कृत्रिम पाईप टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केलाय. पण धोका अजुन टळलेला नाही.
हिंगणघाटमध्ये संतापाची लाट, प्राध्यापिकेच्या मेडिकल रिपोर्टमुळे चिंता वाढली
पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं त्यामुळे अतिशय काळी घ्यावी लागते असंही डॉक्टरांनी सांगिलंय. दरम्यान काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.