हिंगणघाट जळीत प्रकरण: मृत्यूशी झुंझणाऱ्या पीडितेच्या आईने सांगितली अंगावर काटा आणणारी घटना

हिंगणघाट जळीत प्रकरण: मृत्यूशी झुंझणाऱ्या पीडितेच्या आईने सांगितली अंगावर काटा आणणारी घटना

पीडित प्राध्यापिकेवर सध्या नागपूरातल्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. घटनेच्या निषेधासाठी हिंगणघाट आणि वर्ध्यात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

  • Share this:

हिंगणघाट 05 फेब्रुवारी : हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेनं महाराष्ट्र हादरून गेलाय. पीडित प्राध्यापिकेवर सध्या नागपूरातल्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. घटनेच्या निषेधासाठी हिंगणघाट आणि वर्ध्यात नागरीकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मोर्चे आणि निदर्शनांनी शहर दणाणून गेलंय. तर पीडित मुलीचे आई-वडिल न्यायाची मागणी करत आहेत. न्यूज18 लोकमतशी बोलताना पीडित प्राध्यापिकेच्या आईने घटनेच्या दिवशी नेमकं काय झालं याची माहिती देली. त्यावरून आरोपीने किती क्रुरपणे हे कृत्य केलं ते पुढे आलंय.

त्या म्हणाल्या, प्राध्यापक असलेली त्यांची मुलगी ही खेड्यावरून हिंगणघाटला जाणं-येणं करत असे. सकाळी ती डबा घेऊन निघाले होती. हिंगणघाटमधल्या त्या चौकात जेव्हा ती आली त्यावेळी आरोपी विकेश नगराळे हा दडून बसला होता. त्याच्या एका हातात टेंभा होता आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली.

विमानात 30 हजार फुटांवर प्रेग्नंट महिलेला कळा, एअर होस्टेसने केलंं बाळंतपण

तिला पाहताच त्याने एका हाताने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि दुसऱ्या हाताने टेंभ्याने आग लावली अशी अंगावर काटा आणणारी घटना त्यांनी सांगितली. याआधाही आरोपी विकेशने तिला त्रास दिला होता. त्यावेळी त्याला समजही दिली होती. त्याच्या पालकांनाही सांगितलं होतं. त्याला सहा महिन्यांची मुलगी असूनही त्याने हे क्रुरकृत्य केलं. त्यालाही तशीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

त्या पीडित प्राध्यापिकेवर सध्या नागपूरमधल्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केलीय. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक तिच्यावर उपचार करत असून खास मुंबईवरूनही तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलंय आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे मंगळवारी मुंबईतले ख्यातनाम त्वचा तज्ज्ञ डॉ. सुनील केशवानी यांना नागपूरला घेऊन गेले होते. पीडित मुलीसाठी आजचा दिवस म्हणजे पुढचे 24 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून तिच्या प्रकृतीसाठी सर्व राज्यातून प्रार्थना करण्यात येत आहे.

घुसखोरांना हाकलण्याचं इतरांनी श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. त्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्या होत्या. श्वसन नलिका जळाली होती. त्यात धूर गेल्याने प्रचंड त्रास होत होता. डॉक्टरांनी कृत्रिम नलिका टाकत श्वास घेण्यात होत असलेला त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं त्यामुळे अतिशय काळी घ्यावी लागते असंही डॉक्टरांनी सांगिलंय. दरम्यान काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

 

First published: February 5, 2020, 12:33 PM IST
Tags: hinganghat

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading