हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झुंज सुरूच, 5 दिवसानंतर प्रकृती चिंताजनक

हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झुंज सुरूच, 5 दिवसानंतर प्रकृती चिंताजनक

पुढचे काही दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे असून मुंबईचे डॉक्टरही नागपूरात दाखल झाले आहेत.

  • Share this:

नागपूर 7 फेब्रुवारी : सर्व महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाटमधल्या घटनेला 5 दिवस झाले आहेत. पीडितेवर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम प्रयत्नांची शर्थ करत असली तरी पीडितेची प्रकृती चिंताजनकच असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. एका तरुणाने प्राध्यापक असलेल्या पीडितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती 40 टक्के भाजली होती. त्यानंतर तातडीने तिला नागपूरला हलविण्यात आलं होतं. पेट्रोलच्या धुरामुळे तिच्या श्वसन नलिकेत धुर गेला आणि ती भाजली गेली.

त्यामुळे श्वास घेण्यास तिला त्रास होतोय. तर डोळ्याच्या वरचा भाग, कानही जळाले आहेत. तिला अजुनही बोलता येत नाही. पुढचे काही दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे असून मुंबईचे डॉक्टरही नागपूरात दाखल झाले आहेत. तिच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय.

तरुणींची छेड काढलीत तर खबरदार, आता तुमची खैर नाही

गृहमंत्री अनिल देशमुख हे मंगळवारी मुंबईतले ख्यातनाम त्वचा तज्ज्ञ डॉ. सुनील केशवानी यांना नागपूरला घेऊन गेले होते. पीडित मुलीसाठी आजचा दिवस म्हणजे पुढचे 24 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून तिच्या प्रकृतीसाठी सर्व राज्यातून प्रार्थना करण्यात येत आहे.

प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. त्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्या होत्या. श्वसन नलिका जळाली होती. त्यात धूर गेल्याने प्रचंड त्रास होत होता. डॉक्टरांनी कृत्रिम नलिका टाकत श्वास घेण्यात होत असलेला त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

पीडितेच्या उपचारासाठी डॉक्टरांची शर्थ, हिंगणघाट मध्ये मुलींच्या डोळ्यात अश्रू

पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं त्यामुळे अतिशय काळी घ्यावी लागते असंही डॉक्टरांनी सांगिलंय. दरम्यान काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hinganghat
First Published: Feb 7, 2020 10:55 AM IST

ताज्या बातम्या