हिंगणघाट जळीत प्रकरण: 'पीडितेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा'

हिंगणघाट जळीत प्रकरण: 'पीडितेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा'

पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं त्यामुळे अतिशय काळी घ्यावी लागते असंही डॉक्टरांनी सांगिलंय.

  • Share this:

नागपूर 5 फेब्रुवारी : हिंगणघाटमधल्या त्या पीडित प्राध्यापिकेवर सध्या नागपूरमधल्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केलीय. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक तिच्यावर उपचार करत असून खास मुंबईवरूनही तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलंय आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे मंगळवारी मुंबईतले ख्यातनाम त्वचा तज्ज्ञ डॉ. सुनील केशवानी यांना नागपूरला घेऊन गेले होते. पीडित मुलीसाठी आजचा दिवस म्हणजे पुढचे 24 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून तिच्या प्रकृतीसाठी सर्व राज्यातून प्रार्थना करण्यात येत आहे.

प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. त्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्या होत्या. श्वसन नलिका जळाली होती. त्यात धूर गेल्याने प्रचंड त्रास होत होता. डॉक्टरांनी कृत्रिम नलिका टाकत श्वास घेण्यात होत असलेला त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं त्यामुळे अतिशय काळी घ्यावी लागते असंही डॉक्टरांनी सांगिलंय. दरम्यान काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

महाविकास आघाडीचा भाजपला मोठा धक्का, आणखी एक जागा जिंकली

काय आहे घटना?

एकतर्फी प्रेमातून तिला जाळण्यात आलं आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांची वेळेवर एण्ट्री झाली आणि रोखला गेला बालविवाह!

या प्रकरणात आरोपी लिकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अजून बाहेर यायचे आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

 

First published: February 5, 2020, 12:06 PM IST
Tags: hinganghat

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading