नागपूर 5 फेब्रुवारी : हिंगणघाट येथील पीडित तरुणीवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या तरुणीच्या पालकांची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे रुग्णालयाचा खर्च परवडत नव्हता. शासनाने मदत करावी अशी मागणी होत होती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संपुर्ण खर्च सरकार करणार असल्याची घोषणा केली होती. आज नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी रुग्णालयात पीडित तरुणीच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांना मदतीचं पूर्ण आश्वासन दिलं. ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करताहेत. तर हिंगणघाटच्या शाळांमध्ये मुली तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असून आज त्यांचे डोळे पाणावले होते.
रुग्णालयाने 11 लाख 90 हजार रुपयाचे इस्टीमेट दिलं होतं. त्यापैकी चार लाख रुपये पहिल्या टप्प्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पैसे सुद्धा लवकरच देऊ. पैशाबाबत कोणतीही अडचण नाही अशी माहिती विभागीय आयुक्त संजय कुमार यांनी दिली. सोबतच तिच्या पालकांची व्यवस्था सुद्धा हॉटेलमध्ये करण्यात आली असल्याचं सांगितलं. पीडितेच्या ट्रीटमेंटचा फॉलोअप घेतला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त संजय कुमार यांनी दिली.
CAAवरून काँग्रेसच्या या दिग्गज मंत्र्याचं CM ठाकरेंनाच आव्हान
आईने सांगितली घटनेची कहाणी
पीडित प्राध्यापिकेच्या आईने घटनेच्या दिवशी नेमकं काय झालं याची माहिती देली. त्यावरून आरोपीने किती क्रुरपणे हे कृत्य केलं ते पुढे आलंय.
त्या म्हणाल्या, प्राध्यापक असलेली त्यांची मुलगी ही खेड्यावरून हिंगणघाटला जाणं-येणं करत असे. सकाळी ती डबा घेऊन निघाले होती. हिंगणघाटमधल्या त्या चौकात जेव्हा ती आली त्यावेळी आरोपी विकेश नगराळे हा दडून बसला होता. त्याच्या एका हातात टेंभा होता आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली.
विमानात 30 हजार फुटांवर प्रेग्नंट महिलेला कळा, एअर होस्टेसने केलंं बाळंतपण
तिला पाहताच त्याने एका हाताने तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि दुसऱ्या हाताने टेंभ्याने आग लावली अशी अंगावर काटा आणणारी घटना त्यांनी सांगितली. याआधाही आरोपी विकेशने तिला त्रास दिला होता. त्यावेळी त्याला समजही दिली होती. त्याच्या पालकांनाही सांगितलं होतं. त्याला सहा महिन्यांची मुलगी असूनही त्याने हे क्रुरकृत्य केलं. त्यालाही तशीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.