नरेंद्र मते, हिंगणघाट 04 फेब्रुवारी : एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के भाजली होती. तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून पुढचे 48 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. श्वासनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतोय. तिच्या डोळ्यालाही दुखापत झालीये. तिच्या चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेलाय. त्यामुळे तिची परिस्थिती गंभीर आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज हिंगणघाट बंदचं आयोजन करण्यात आलं असून मोर्चाही काढण्यात येणार आहे.
आज हिंगणघाट येथे सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. सर्वपक्षीय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडला पण त्याच्यावर काळाचा घाला, अपघातात जागीच ठारकाय आहे घटना?
एकतर्फी प्रेमातून तिला जाळण्यात आलं आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी लिकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अजून बाहेर यायचे आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
नंदोरी नाक्याजवळ पीडित तरुणीच्या गावातील 2 तरुण आणि पीडिता यांच्या शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तरुणांनी तिला भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पीडितेला वाचवलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला उपचारार्थ नागपूर येथे दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले तर अधिक तपासातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.