Home /News /maharashtra /

लग्नासाठी वडिलांना आणखी कर्ज घ्यावं लागेल म्हणून उच्चशिक्षित मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

लग्नासाठी वडिलांना आणखी कर्ज घ्यावं लागेल म्हणून उच्चशिक्षित मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

आई-वडील घरी परत आल्यानंतर लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलेल्या आपल्या मुलीचा लोंबकळत असलेला मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला.

अमरावती, 29 डिसेंबर: सरकार (Government) कुणाचाही आलं तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide issue) मात्र थांबत नाही आहेत. विदर्भात नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत वडिलांच्या कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्यांच्या मुलींवरही आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) नेर पिंगळाई येथील एका उच्चशिक्षण तरुणीनं आपलं जीवन संपवलं आहे. मोहिनी अरुण टींगणे असं या तरुणीचं नाव होतं. तिनं बीएस्सीचं (BSc) शिक्षण घेतलं होतं. मात्र, आता आपल्या लग्नासाठी वडिलांना आणखी कर्जबाजारी व्हावं लागेल. लग्नाचा ताण नको म्हणून मोहिनीनं आई-वडील व भाऊ शेतात गेल्यानंतर घरी ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा...कोरोना लशीचा मोह तुम्हाला आणू शकतो संकटात, महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार समोर नेर पिंगळाई येथील अरुण विठ्ठल टिंगने यांच्या कडे 4 एकर शेती असून त्यांनी या शेतीवर सेन्ट्रल बँक शाखेचं एक लाख अठरा हजार कर्ज काढलेले आहे. यावर्षी निसर्गाची साथ लाभली नाही. सोयाबीन पिकावर खोडकिडा आल्याने संपूर्ण पिकांवर रोटाव्हेटर मारावे लागले. कपाशीवर बोंडअळी आल्यानं संपूर्ण पिके उद्धवस्त झालं. 4 एकर शेतात केवळ 5 क्विंटल कापूस निघाला. यातच यावर्षी मुलगी मोहिनी हिचं लग्न करायचं होतं. आर्थिक अडचणीमुळे घरात चिंतेचे वातावरण होतं. BSc चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही केवळ फी भरायला 20 हजार नव्हते. म्हणून गेल्या वर्षी MSc ला मोहिनीला प्रवेश घेता आला नाही. वडिलांना आपल्या लग्नासाठी आणखी कर्जबाजारी व्हावे लागेल, लग्नाचा ताण नको म्हणून मोहिनी अरुण टिंगने या तरुणीने आई वडिल व भाऊ शेतात गेल्यानंतर घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी आई-वडील घरी परत आल्यानंतर लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलेल्या आपल्या मुलीचा लोंबकळत असलेला मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे. संपूर्ण नेर पिंगळाई गावावर शोककळा पसरली आहे. मुलीच्या आठवणीनं आई वडिलांचे अश्रू अनावर झाले आहेत. हेही वाचा..मजुरीचे पैसे मागणं जीवावर बेतलं, घरी आलेल्या मजुरासोबत मालकांनीच केलं असं... शेतकरी आत्महत्या... वर्ष 2020- एकूण -,1060 पात्र -,503 अपात्र -440 तपास प्रलंबित -217 वर्ष 2019- एकूण 1056, पात्र-587 अपात्र -458, तपास प्रलंबित -11
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: अमरावती, आत्महत्या, महाराष्ट्र

पुढील बातम्या