गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला.. भंडाऱ्यात घर कोसळून एक ठार, दोघी जखमी

गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला.. भंडाऱ्यात घर कोसळून एक ठार, दोघी जखमी

संततधार पावसामुळे घरावर भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.

  • Share this:

भंडारा, 8 सप्टेंबर- संततधार पावसामुळे घरावर भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. तुमसर तालुक्याच्या सिंधपुरी येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. मिलकराम इसाराम शेंडे (54) याचा भिंतीच्या खाली दबून मृत्यू झाला आहे. तर कुंदा नेवारे (24) आणि निर्मला श्यामराव वगरे (50) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी 7 वाजता सगुणाबाई शेंडे यांच्या घराची भिंत शेजारच्या घरावर कोसळली. मातीच्या ढिगाऱ्याखाली तीन जण दबले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही बाहेर काढले. मात्र, तोपर्यत मिलकराम यांचा मृत्यू झाला होता. जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, चार वर्षांपूर्वी सिंधपुरी गावात तलावाची पार फुटल्याने गावातील अनेक घरे कोसळून पडली होती. मात्र, गावातील लोकांना अजुनही घरकुलचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे बहुतांश गावकऱ्यांना धोकादायक घरात वास्तव्य करावे लागत आहे.

दरम्यान, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली असून वीस मार्ग बंद आहेत. जवळपास तीनशे गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडची पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. हेलिकॉप्टरने जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भामरागडच्या पुरपरिस्थितीची पाहणी केली. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीच्या पाण्याने चारी बाजुने भामरागडला वेढा दिल्यानं सहाशे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

VIDEO: गडचिरोली पाण्याखाली; काळजात धडकी भरवणारी पुराची विदारक दृश्यं

First published: September 8, 2019, 4:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading