उन्हाचे चटके आता आणखी तीव्र होणार, विदर्भात हवामान विभागाकडून रेड अलर्ट

उन्हाचे चटके आता आणखी तीव्र होणार, विदर्भात हवामान विभागाकडून रेड अलर्ट

राजस्थानच्या चुरूमध्ये 50 तर उत्तर प्रदेशातील बंदा इथे 48 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मे : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यंदा सर्वात जास्त उष्णता जाणवू लागली आहे. तापमानाचा पारा 45 पार गेला आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच आता हवामान विभागाक़डून विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे 4 दिवस विदर्भात उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. देशभरात एकीकडे कोरोनाचं संकट दुसरीकडे अम्फान तर आता त्यापाठोपाठ येणारी उष्णतेची लाट.

हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाल्यानं पावसाची चातकासारखी वाढ पाहात आहेत. यंदा मान्सूनचा प्रवास आधीच लांबणीवर पडला असताना आणखीन लांबल्यास शेतकऱ्यांसह नागरिकही चिंतेत असणार आहेत.

हे वाचा-हॉस्पिटलमध्ये आरोपींनी केला ड्रामा, पोलिसांनी दोघांना पकडलं पण...

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोल 46.5

अमरावती 45.6, चंद्रपूर 45.2, यवतमाळ 45.5, गोंदिया 45.0, नागपूर 46.8 अशी तापमानाची नोंद मंगळवारी करण्यात आली आहे. महिन्या अखेरीस हा पारा पन्नासी गाठणार का? अशी चर्चा होत आहे. विदर्भानं पंचेचाळीसी ओलांडली आहे. येत्या 4 दिवसांत तीव्र उष्णतेची लाट येईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

देशभरात राजस्थानमध्ये मंगळवारी 50 अंश सेल्सियस तापामानाची नोंद करण्यात आली असून उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानच्या चुरूमध्ये 50 तर उत्तर प्रदेशातील बंदा इथे 48 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हे वाचा-रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोरोना वॉरियर्सचं संपूर्ण कुटुंब निघालं पॉझिटिव्ह

हे वाचा-लॉकडाउनबद्दल अजित पवारांनी दिले मोठे संकेत; मुख्यमंत्र्यांशीही बोलणार!

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 27, 2020, 10:56 AM IST

ताज्या बातम्या