हरितालिका विसर्जन जीवावर बेतले, दोन मुलं आणि दोन महिला नदीत गेले वाहून

हरितालिका विसर्जन जीवावर बेतले, दोन मुलं आणि दोन महिला नदीत गेले वाहून

आमदार समीर कुणावार यांनी घटनास्थळी पोहचून प्रशासकीय यंत्रणा हलविली. आता NDRFची टीम बेपत्ता झालेली महिला आणि दोन मुलांचा शोध घेत आहे.

  • Share this:

नरेंद्र मते, वर्धा 2 सप्टेंबर : हिंगणघाट येथे हरितालिका गौरी विसर्जन करताना तोल जाऊन दोन महिला आणि दोन लहान मुलं असे चार जण वणा नदी पात्रात बुडाल्याची  घटना दुपारी घडली. यात पोलीस कर्मचारी तातडीनं मदतीला धावल्याने वाहून जात असलेल्या एका महिलेला पोलीस कर्मचाऱ्यान बाहेर काढलं. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं तर एक महिला व दोन लहानगे असे तिघे बेपत्ता आहेत. एनडीआरएफच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जातोय. घटनास्थळी पोलीस,आमदार व जिल्हाधिकारी दाखल झाले आहे.

प्रियकरासमोरच प्रेयसीचा शॉक लागून मृत्यू

आज दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घरी गौरी पूजन करून शास्त्री वार्डातील काही महिला वणा नदी रेल्वे पुलाजवळ  कवडघाट घाटावर गौरी विसर्जन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत दोन मुलंही होती.  विसर्जन करताना एक मुलगी पाय घसरून पाण्यात पडला. तो वाहून जात असताना त्याची बहिणही त्याला वाचवण्यासाठी नदीपात्रात गेली. तीला वाचवण्यासाठी त्यांच्या आईने नदीत उडी घेतली आणि त्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या एका महिलेने वाचविण्यासाठी पाण्यात गेल्या. या प्रयत्नात सर्वच जण वाहून गेले.

रिया रंजित भगत ( 35) यांच्या सोबत अभी ( 10) व अंजना ( 13)  ही दोन मुलं सोबत होती.  आई सोबत नदीपात्रात गेलेला अभी वाहू लागल्याने बहीण अंजना त्याला वाचविण्यासाठी धावली तीही पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तिची आई रिया भगत ने धाव घेतली. या तिघांना वाहताना पाहून शेजारच्या दिपाली मारोती भटे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ती सुद्धा पाण्यात वाहू लागली.

'युती'चा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार', शिवसेनेची गुगली!

याघटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदी पुलाजवळ एक महिला वाहून जात असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता एका पोलिसाने नदीपात्रात उडी मारून एका महिलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिला बाहेरही काढले. त्यावेळी ती जिवंत होती. जागेवर प्राथमिक उपचार करून त्यांनी तिच्या पोटातील पाणी काढले व उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र रुग्णालयात नेत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.  या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी घटनास्थळी पोहचून प्रशासकीय यंत्रणा हलविली. आता  NDRFची टीम बेपत्ता झालेली महिला आणि दोन मुलांचा शोध घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या