गणेश विसर्जनासाठी नदीपात्रात उतरलेल्या चार भाविकांचा बुडून मृत्यू

गणेश विसर्जनासाठी नदीपात्रात उतरलेल्या चार भाविकांचा बुडून मृत्यू

गेली 10 दिवस मनोभावे पूजा केलेल्या बाप्पांच्या विसर्जानाच्या दिवशी केलेला निष्काळजीपणा 4 जणांच्या जीवावर बेतलाय.

  • Share this:

राजेंद्र शेंडे, अमरावती 12 सप्टेंबर : गेली 10 दिवस मनोभावे पूजा केलेल्या बाप्पांच्या विसर्जानाच्या दिवशी केलेला निष्काळजीपणा 4 जणांच्या अंगलट आला. अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर इथं गणेश विसर्जनादरम्यान नदी पात्रात 4 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह शोधण्यासाठी पोलीस व गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश विसर्जनाच्या जल्लोशात विसर्जनाच्या वेळी अनेक जण नदी पात्रात उतरले होते. त्यात या चार जणांचाही समावेश होता. मात्र नदीतल्या पाण्याची खोली कळाली नसल्याने ते सर्व पाण्यात बुडाले. त्यांना पोहोणही येत नसल्याने त्यांना पाण्यातून बाहेर निघता आलं नाही.

दुसऱ्या एका घटनेत शहापूर  तालुक्यातील कुंडनच्या नदी तोल जावून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कल्पेश प्रकाश जाधव  (  वय 12 ) असं मुलाचं नाव असून तो कुंडन गावातील कातकरी वाडी राहाणारा आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी तोल गेल्याने  नदीच्या तो प्रवाहात वाहून गेला आणि त्यातच त्याचा अंत झाला.

काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचं टार्गेट मनसे, 'या' तालुक्यात खिंडार

गणेश विसर्जनादरम्यान तिघांचा मृत्यू

लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावात राहणारा लोकेश देवराम शिवणकर हे भाविक गणपती विसर्जना दरम्यान मासळ शेतशिवारातील नाल्यात वाहून गेला. त्यांचे वय 40 वर्षे होतं. आज ढोलसर वरुन वाजत गाजत गणपती विसर्जना ची मिरवणुक मासळ जवळील नाल्यावर आली असताना मासळ- बाचेवाडी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर गणपती विसर्जना दरम्यान मुर्ती ढकलतेवेळी  पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहुन गेला. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला यश आलं नाही. लोकांनी त्यांचा शोध घेतला मात्र अजुनही थांगपत्ता लागला नाही. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुली आहेत.

शरद पवारांच्या भेटीनंतर उदयनराजेंचा भाजप प्रवेश ठरला? तारखही निश्चित

सध्या गेल्या काही दिवसांपासून परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी वाहत आहेत. मराठवाड्यात नांदेडजवळही  गणेश  विसर्जनाच्या वेळी  खदानीत बुडून एका भाविकांचा मृत्यू झाला. शशिकांत कोडगीरवार असं त्या युवकाचं नाव असून तो 21 वर्षांचा होता.  हदगाव तालुक्यातील तामसा गावातली ही घटना आहे. गावकऱ्यांनी त्याचा  मृतदेह खदानीबाहेर काढला.

First published: September 12, 2019, 8:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading