मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडेही लक्ष द्या! गडचिरोलीतल्या पूरग्रस्तांची हाक

मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडेही लक्ष द्या! गडचिरोलीतल्या पूरग्रस्तांची हाक

भामरागड तालुक्यातल्या शंभर गावांचा संपर्क तुटला हेमलकसा ते भामरागड दरम्यान पर्लकोटा नदीवरील मोठा पुल पाण्याखाली गेल्याने पुर्ण शंभर गावे संपर्कहीन झाली होती.

  • Share this:

गडचिरोली 12 सप्टेंबर : राज्यात कोल्हापूर, सांगली नंतर पुराचा फटका बसला तो गडचिरोली जिल्ह्याला. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला. आठ दिवस पर्लकोटा आणि पामुलगौतम तसेच इंद्रावती  नद्यांच्या पाण्याने या तालुक्याला घेरलं होतं. एकशे पंचवीस गावे संपर्कहीन होऊन वीजपुरवठा आणि मोबाईलसेवाही बंद पडल्यानं नेमक काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सॅटेलाईट फोनचा वापर करावा लागला. पूरामुळे इथलं अर्थकारणच बिघडल असून सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलीय. आत्तापर्यंत भामरागडमध्ये 7 वेळा पूर आला होता.

सातव्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे परत एकदा पर्लकोटा नदीचा पुल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे..पाऊस असल्याने मदत कार्य तसेच सर्वेक्षणात अडथळा निर्माण होत असल्याचे तहसिलदार कैलास अंडील यांनी सांगितले.

बीडचा अनिल कपूर म्हणतोय मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, राज्यपालांना पत्र

भामरागड तालुक्याला मुसळधार पावसासह पुराने झोडपल्यानंतर छत्तीसगडच्या इंद्रावती नदीच्या दाबातुन पर्लकोटा नदीला पुर येऊन भामरागड तालुक्यातल्या शंभर गावांचा संपर्क तुटला हेमलकसा ते भामरागड दरम्यान पर्लकोटा नदीवरील मोठा पुल पाण्याखाली गेल्याने पुर्ण शंभर गावे संपर्कहीन झाली होती. हा पुल नेहमीच पाण्यात बुडत असुन नवीन पुल बांधला तर नेहमीची परिस्थिती बदलु शकते. पण अनेकदा मागणी करूनही हा पूल बांधण्यात आलेला नाही.

भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसुन आठ दिवस एकशेपंचवीस गावे संपर्कहीन झाली होती..तब्बल 65 किलोमीटरच्या मार्गावरील पुल आणि रस्ते पाण्याखाली गेले होते पेरमिली नंतर भामरागड मार्गावर असलेल्या बांडीया नदीवरील पुलही पाण्याखाली होता.

या पुरपरिस्थितीत सर्वाधिक महत्वपूर्ण भुमिका बजावली ती स्थानिक तहसिलदार कैलास अंडील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्यासह बीडीओ महेश ढोके यांच्या नेतृत्वात प्रशासकीय यंञणेने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जिकारीचे प्रयत्न केले..तहसिलदार कैलास अंडील यांचाया नेतृत्वात तब्बल तीन हजार नागरीकाना सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान पुर ओसरताच जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भामरागडला भेट देऊन पुरग्रस्ताशी संवाद साधुन त्याना मदतीचे आश्वासन दिलंय.

IAS-IPS च्या सोसायटीत राजरोसपणे सुरू होते सेक्स रॅकेट... असा झाला भंडाफोड

पर्लकोटा आणि पामुलगौतम नद्यांच्या पाण्याने सत्तर टक्के भामरागड आठ दिवस पाण्याखाली होतं. भामरागडची मुख्य बाजारपेठ पुर्ण पाण्याखाली गेल्याने संपुर्ण बाजारपेठच उद्धवस्त झालीय. तालुक्यातल्या शंभर गावासाठी एकमेव आधारस्तंभ असलेल्या या बाजारपेठेची अवस्था महापूरानंतर बकाल झाली. पुरामुळे सहा आठवडयापासुन आठवडी बाजार भरला नव्हता. शंभर गावासाठी खरेदीच आधार हा आठवडी बाजार आहे. त्यामुळे आदिवासांना मोठा फटका बसलाय. पूरामुळे कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे परिस्थिती पूर्व पदावर यायला अनेक दिवस जावू द्यावे लागणार आहे.

भामरागडची परिस्थिती अशी होती की 65 किलोमीटरचा मार्ग बंद असल्याने  बाहेरुन मदत पोहचु शकत नाही. आदिवासींची घरं ही मातीची आहेत. पाण्यामुळे ती घरं कोसळी. संसार वाहून गेला.  धान्य, संसारउपयोगी साहित्य नष्ट झालंय शाळा पाण्यात बुडून शैक्षणिक साहित्यासह पोषण आहार खराब झालाय.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 12, 2019, 3:42 PM IST
Tags: gadchiroli

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading