मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रवचनासाठी महाराज आला आणि दुसऱ्याची तरुण बायको घेऊन पळून गेला

प्रवचनासाठी महाराज आला आणि दुसऱ्याची तरुण बायको घेऊन पळून गेला

तिच्या घरीही तो काही दिवस राहिला होता. त्याच दरम्यान त्याने तिच्याशी सुत जमवलं. आणि भागवत सप्ताह संपल्यानंतर तो तिला घेऊन पळून गेला.

तिच्या घरीही तो काही दिवस राहिला होता. त्याच दरम्यान त्याने तिच्याशी सुत जमवलं. आणि भागवत सप्ताह संपल्यानंतर तो तिला घेऊन पळून गेला.

तिच्या घरीही तो काही दिवस राहिला होता. त्याच दरम्यान त्याने तिच्याशी सुत जमवलं. आणि भागवत सप्ताह संपल्यानंतर तो तिला घेऊन पळून गेला.

  • Published by:  Ajay Kautikwar

भंडारा 8 फेब्रुवारी : आसाराम बापू आणि इतर काही बुआ बाबांच्या 'रासलीलां'मुळे भोंदू बाबांचं पितळ उघडं पडलंय. त्याच्या कथा अजुनही चर्चेत असतात. अशाच एका घटनेने विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात खळबळ उडालीय. भागवत सप्ताह करण्यासाठी गावात आलेल्या एका तथाकथित महाराजाने गावातल्याच एका विविहित तरुणीला फुस लावून पळवून नेल्याचं उघड झालं. हा महाराज आता महाराष्ट्राबाहेर पळून गेल्याचं उघड झालंय. आता या महाराजाच्या कृष्णकृत्याचा भांडाफोड झाला असून त्याला तीन बायका असल्याचंही उघड झालंय.

अनेक गावांमध्ये दरवर्षी भागवत सप्ताहाचं आयोजन केलं जातं. गावकरी आणि गावातल्या सामाजिक संघटना एकत्र येवून हा कार्यक्रम करत असतात. अशाच एका भागवत सप्ताहाचं आयोजन भंडारा जिल्ह्यातल्या मोहदुरा इथं घडलीय. या गावात दिनेशचंद्र मोहतुरे महाराज याला भागवतासाठी बोलावण्यात आलं होतं. बोलण्याच चतुर असलेला हा महाराज भागवत कथा सांगण्याचं काम करतो. सावनेर जवळच्या कुबाडा या गावचा तो राहणारा आहे.

OMG! पुण्यात बाहुबली थाळी; सगळं संपवलंत तर मिळेल लाईफटाईम फ्री जेवण

वर्षभरापूर्वीही त्याने याच गावात भागवत सप्ताह केला होता. सात दिवस चालेल्या सप्ताहाची नुकतीच समाप्ती झाली. त्यानंतर तो गावातून गेला. गावकऱ्यांनी त्याला चांगलं मानधनही दिलं होतं. मात्र तो गेल्यानंतर एका घरातली तरुण विवाहिता बेपत्ता असल्याचं लक्षात आलं.

मुलीला पेटवल्याची धक्कादायक चर्चा, मात्र माय-लेकीने पोलिसांसमोर दिलं 'हे' कारण

ही महिला एका 5 वर्षांच्या मुलाची आईही आहे. तिच्या सासऱ्याची आणि त्याची ओळख होती. तिच्या घरीही तो काही दिवस राहिला होता. त्याच दरम्यान त्याने तिच्याशी सुत जमवलं. आणि भागवत सप्ताह संपल्यानंतर तो तिला घेऊन पळून गेला. घरातल्या लोकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यानंतर मोबाईलवर महाराजाशी संपर्क साधला असता ते दोघे वृंदावनमध्ये असल्याचं त्याने सांगितलं.

आता या महाराजाच्या अनेक कथा समोर येत असून त्याने आधी तीन महिलांसोहत असाच प्रकार केल्याचं समोर आलं असून तो विवाहित आहे आणि त्याला एक मुलगीही आहे असं समोर आलंय.

First published:

Tags: Bhandra