Home /News /maharashtra /

नागपुरात खळबळ: डॉक्टर पत्नीसह कुटुंबातल्या चौघांची आत्महत्या, दोन मुलांचा समावेश

नागपुरात खळबळ: डॉक्टर पत्नीसह कुटुंबातल्या चौघांची आत्महत्या, दोन मुलांचा समावेश

धीरज राणे हे प्राध्यापक आहेत, तर पत्नी सुषमा राणे या डॉक्टर आहेत. त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला हे अजुनही कोडं आहे.

नागपूर 18 ऑगस्ट: सामुहिक आत्महत्येच्या घटनेनं मंगळवारी नागपूरात खळबळ उडाली. पती पत्नी आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. एकाच कुटूंबतील चार जणांची आत्महत्या केल्याने सगळेच हादरुन गेले आहेत. कोराडी रोड ओमनगर परीसरातील राणे कुटुंबियांनी हा टोकाचा निर्णय घेतला. धीरज राणे हे प्राध्यापक आहेत, तर पत्नी सुषमा राणे या डॉक्टर आहेत. 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी लावण्या यांचाही यात समावेश आहे. आत्महत्येचं कारण अजुन कळालेलं नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चौकशीला सुरुवात झाली आहे. या घटनेने राणे कुटुंबीय आणि त्यांच्या शेजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. या बाबात मिळालेली प्राथमिक माहिती आणखी धक्कादायक आहे. राणे हे कुटुंबासह कोराडी नजीक ओम नगर येथे राहत होते. धीरज राणे आणि त्यांची पत्नी आज सकाळी उशिरा पर्यंत उठले नाही म्हणून त्यांच्या आत्या आईने आवाज दिले. त्यावेळी धीरज यांची पत्नी सुषमा त्यांच्याशी बोलल्या. पोळ्याची सुटी असल्याने त्यांना झोपू द्या असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सुषमा यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळली आहे. सुषमा राणे डॉक्टर होत्या तर धीरज नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर होते. धीरज आणि त्यांच्या मुलांचा मृतदेह हा बेडवर आढळून आल्याचीही माहिती आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Suicide

पुढील बातम्या