भरधाव टॅक्सीची दुचाकीला भीषण धडक, दोन मुलांसह आई-वडिलांचा मृत्यू

भरधाव टॅक्सीची दुचाकीला भीषण धडक, दोन मुलांसह आई-वडिलांचा मृत्यू

भरधाव टॅक्सीने दुचाकीला भीषण दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मुलांसह आई-वडिलांचा जागेवर मृत्यू झाला.

  • Share this:

संजय शेंडे,(प्रतिनिधी)

अमरावती, 21 नोव्हेंबर: वरुड-राजुरा बाजार मार्गावर भरधाव टॅक्सीने दुचाकीला भीषण दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन मुलांसह आई-वडिलांचा जागेवर मृत्यू झाला. सुरज डाफे यांच्या शेताजवळ गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवर स्वार असलेले सोनारे कुटुंबातील सदस्या लांबपर्यंत फेकले गेले. टॅक्सी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. प्रकाश रामकृष्णाजी सोनारे, जयश्री प्रकाश सोनारे, आयुष सोनारे आणि वैष्णवी सोनारे (सर्व रा.मालखेड, ता.वरूड) अशी मृतांची नावे आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी या गावी तेरवीच्या कार्यक्रमाला जाताना सोनारे यांच्या दुचारीला समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी चारही मृतदेह पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. संबंधित टॅक्सी चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

मुंबईत भररस्त्यावर बर्निंग कारचा थरार

दरम्यान, मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर धावत्या कारला आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पवईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

First published: November 21, 2019, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading